MarathiBlogNet

शुक्रवार, 25 नवंबर 2022

खेळत राहते

 आई जेव्हा एकटी असते

 तेव्हा निवांत क्षणी बटनाशी

खेळत राहते


ती बटणे जुन्या कपड्यां पासून वेगळी काढत राहते

जमा करते,

कधी तरी उपयोगी पडतील,


प्रत्येक बटणावर हळुवार हात फिरवते व त्याची रचना न्याहाळीत राहते,


बटणाशी निगडित जुने कपडे

कपड्यांशी निगडित व्यक्ती

आठवत राहते त्यांची नाती

व हरवलेली प्रत्येक व्यक्ती,


विविध रंग,आकार व रचनेची

बटणे

नातीच्या सहाव्या जन्म दिवशी तीने घातलेला गाऊन

 आठवीत राहते

लाल फ्रॉक वर किती सुंदर दिसत होता मोत्यांचा सजावटी बटण


हे बटण त्यांच्या रेशमी शर्टाचा

हे बटण बिट्टूच्या फुल पॅण्ट चे, 


आई ती बटणे वर्तमान पत्रावर

तर कधी ओंजळीत घेते

 तिला आठवतात कधी सागरगोटे तर कधी गोटी, 


लिंबाच्या झाडाच्या खाली

काली मातेचे मंदिर

तिला आठवते तिच्या आईच्या ब्लॉऊज चे बटण

ती सांगत राही

माझ्या म्हातारीच्या डोळ्यांना

काजे बटण सापडतात

तुमचे ते हुक अडकवणे नाही जमत, 


ती कधी बाबूजी यांच्या

खादी शर्टाची बटणे 

शोधीत राहते इथे-तिथे


ती स्वतः चे अस्तित्व विसरून

नात्यांच्या आठवणीत हरवते

या बटणामुळे दिवस कसा जातो,समजत नाही

एकटेपणात बटणे तिला

साथ देतात.


******

मूळ हिंदी कविता-

 अनामिका अनु


मराठी अनुवाद- 

विजय नगरकर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें