MarathiBlogNet

गुरुवार, 14 जून 2018

काय मिळाले असते

"काय मिळाले असते ? "

स्त्रीच्या भावनेचा सिटी स्कॅन केला तर
अपमानाच्या असंख्य घटनांचा
धोकादायक साकाळलेला डोह मिळाला असता,
निराशेच्या गंभीर जखमेतील
वाहती वेदना दिसली असती,
अगतिक बैचेनीची आकडेवारी
लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसली असती
ताटातुटीच्या भयाने वाढलेली गती
अनेक रात्र  जागलेल्या आसवांनी
बेफाण पुरात वाहाताना,
कंठात रुतलेले उत्तर दिसले असते
सकारण हारलेले वादविवाद
दयनीय अवस्थेत मिळाले असते
उपेक्षेच्या डंखाचे निशान

त्या मशीनला ऐकू आली असती
कोंडलेल्या  हुंदक्यांची आर्तता
रिक्तपणाचे साचलेले मळभाचे घनदाट आकाश
अगतिक रात्रीच्या बदलेल्या असंख्य कुशी
धोक्याच्या निशानीच्या वर पोहचलेल्या,
प्रेम याचनेचा उच्च स्वर आकाशाला भिडणारा
वेदना लपवून ठेवण्याचा चिंताजनक ग्राफ

सहन केलेले टोमणे व टोचून बोलले स्वर
छिन्न भिन्न स्वप्नांचा एक मोठा पुंजका  मिळाला असता
अनवरत टिकेचे खोल व्रण दिसले असते
भावना शोधणारी मशीन असती तर
सुहास्य मुद्रे मागील
वेदनेचे सत्य समोर आले असते

मुळ हिंदी कविता-  " क्या क्या मिलता "
                           
डॉ मधु चतुर्वेदी,मुम्बई
मराठी अनुवाद-        विजय नगरकर

चि सौ कां

पुस्तकांच्या कपाटात ती सोडुन जाते
कव्हरवर लिहिलेले तीचे नांव
भिंतीवर टांगलेली सुंदर ऑईल पेंटिंग तसबीर
चित्राच्या एका कोपर्यात लिहिलेले तिचे नांव
एका नाजुक जाणीवेच्या अबोल निशानीसह
ती घर सोडुन जाते,
मांडव परतणीच्या क्षणाला
मुलगी मागे वळुन न पाहता
मेहंदी लावलेल्या पावलांनी निरोप घेते,

स्वयंपाक घरातील नव्या फॅशनच्या क्रॉकरी
तिच्या पसंतीची बैठक सज्जा, सोफा
तिच्या कपाटातील ठेवून दिलेली ठेवणीतील कपडे
खरेदी केलेल्या तमाम नव्या वस्तु बॅगेत भरुन
अंगणातल्या तुळशी खाली आपले मन दफन करुन
मुली आपला निरोप घेतात.

भकास या घरात आता आठवतात तिचा निरागस स्पर्ष
पुजेच्या घरातील रांगोळीत बुडालेले तिचे सुंगधी हात
घर आंगण सोडताना साश्रु  नयनांनी
मांडव परतणीच्या क्षणाला
मुलगी मागे वळुन न पाहता
मेहंदी लावलेल्या पावलांनी निरोप घेते,

फोटो अल्बम मधील तीची सुहास्य मुद्रा
धुळीने माखलेले पदक व पुरस्कार चिह्न
ठेवून जाते परसदारी फुललेली झेंडुची फुले
बाहुलीला गुंडाळलेली जुनी पुरानी साडी
उदास खेळण्यात उदास विराणी सोडुन जातात मुली,
मुली निरोप घेतानी मनाला चटका लावुन जातात,
टिव्हीवर तिच्या लग्नाची सीडी पाहताना
तिच्या निरोपाचा क्षण येतो तेव्हा
बाप जागा सोडुन उठुन जातो,

सर्व नखरे एका टोपलीत घेउन
मुली निरोप घेताना मनाला चटका लावून जाते

( मूल हिंदी कविता-  मधु चतुर्वेदी)
मराठी अनुवाद- विजय नगरकर)