MarathiBlogNet

गुरुवार, 26 जुलाई 2012

भाषाभगिनींमध्ये निर्थक वाद नको

दैनिक लोकसत्ता दि.17-11-2009 मध्ये प्रकाशित माझे पत्र-
‘मराठीतून शपथ : अक्कलशून्य राजकारण’ या पत्रातील विचारांशी मी सहमत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारणाला ग्रहण लागले आहे की काय, असेच या प्रकरणी वाटते. भारताला ‘एक राष्ट्र’ या संकल्पनेपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक राजकीय, साहित्यिक, संत व समाजकारण्यांनी आयुष्य वेचले आहे. म्हणूनच एक राष्ट्र, एक ध्वज, एक राष्ट्रभाषा या तत्त्वाला तडा देण्याचे देशविघातक कृत्य कोणी करू नये.
इतिहासकार वि. का. राजवाडे एका संस्थानिकाकडे संशोधनाकरिता आर्थिक मदत मागण्यासाठी गेले. संस्थानिकाने त्यांची मागणी झिडकारत म्हटले की ‘राज्याकडे साहित्य, इतिहासासाठी खजिना नाही.’ तेव्हा राजवाडे संतापून म्हणाले, ‘जनानखान्यातील बायकांची संख्या कमी करा व लावण्यांवरील दौलतजादा कमी करा. इतिहास वाचाल तर तुमची पुढची पिढी वाचेल.’ आज सर्वच राजकारण्यांनी भारताचा व भारतीय भाषांचा इतिहास वाचण्याची गरज आहे.
भारत सरकारने राजभाषा, संपर्कभाषा, जनभाषा, धर्मभाषा, व्यवहारभाषा हिंदीकरिता काय काय केले आहे ते तपासले पाहिजे. मातृभाषेचा अभिमान सर्वानीच ठेवला पाहिजे. परंतु राष्ट्रउभारणीतले हिंदी भाषेचे योगदान समजून घेतले पाहिजे. हिंदी भाषकांना हाकलून दिल्याने महाराष्ट्रातील समस्या सुटणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांनीही सरदारांशी मराठी व हिंदीतून पत्रव्यवहार केलेला आहे. महाराष्ट्र सरकारनेही मराठीनंतर हिंदीचाच स्वीकार केलेला आहे. मराठी संतांनी भारतभ्रमण करून धार्मिक विचार हिंदीतून प्रसारित केले होते.

पहला गिरमिटिया









दक्षिण अफ्रिकेतील महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक कांदबरी पहला गिरमिटिया सुप्रसिद हिंदी साहित्यकार श्री गिरिराज किशोर यांनी लिहिली आहे. ऐतिहासिक कांदबरी लिहिताना भूतकाळातील घटना, प्रसंग, वास्तु, शहर, देश व तत्कालीन सामाजिक स्थितीचा अभ्यास करावा लागतो. या साठी लेखकाने दक्षिण अफ्रिकेचा दौरा केला आहे. दक्षिण अफ्रिकेतील महात्मा गांधीच्या आठवणीवर आधारित ही एक सामाजिक राजकीय कांदबरी आहे. कांदबरीच्या सुरुवातीला अपर्ण पत्रिकेत लेखकाने च् त्या भारतीयांना व त्यांच्या संततीला जे 19 व्या शतकामये दूर परदेशात गिरमिटिया व यात्रीच्या रुपाने समृदिचा पूल बनले, जे पुन्हा काधीच परतले नाहीत त्या भारतीयांना ज्यांना समुद्राने गिळंकृत केले आणि त्यांच्या संततीला जे समुद्राच्या लाटावर आमरण जीवंत राहिले, येणा-या काळात वाढणा-या माझ्या नातवाला च्तन्मय छ व नातीला च् वान्या छ ज्यांना मोहनदास समजून घेणे कदाचित अत्यंत जरुरीचे आहे. मोहनदास च्या रुपात जो आपल्या देशाकरीता, लोकांकरीत व स्वातंत्र्याकरीता, परक्या भूमिवर झटला आणि महात्मा गांधीच्या रुपाने आपलाच भूमीवर गोळी
झेलून राम-राम म्हणत कायमचा निघून गेला.
19 व्या शतकात इंग्रजांनी दक्षिण अफ्रिकेतील वसाहतीत हिंदुस्तान माधील मजूरांची फार मोठया प्रमाणात करारावर आयात केली. उत्तर भारतीय अडाणी ग्रामीण मजुर तत्कालीन एग्रीमेंट या शब्दाचा उच्चार गिरमिट असा करीत. त्यामुळे एग्रीमेंट वर परदेशात गेलेल्या मजुराला गिरमिटिया संबोधले जाउ लागले. महात्मा गांधी सुदा दक्षिण अफ्रिकेत डर्बन येथे नोकरीसाठी सेठ दादा अब्दुल्ला यांच्याकडे कराराने गेले होते. त्यामुळे ते सुदा गिरमिटियाच होते.
गो-या लोकांनी जगावर राज्य केले. अनेक वसाहती निमार्ण केल्या. अमेरिकेतील काळया लोकांचे 17 व्या शतकात त्यांनी हकालपट्टी केली. काही काळे लोग दक्षिण अफ्रिकेत स्थलांतरित झाले. जुलू ,स्वानिज, बुशेआनाज, भाषिकांचे विभिन्न कबिले निर्माण झाले. त्यांना गोरे लोक नेटीव समजू लागले. 19 व्या शतकात गो-या लोकांचे दक्षिण अफ्रिकेवर राज्य स्थापन झाले . एक लाख गोरे , 5 लाख काळया नेटिव लोकांवर राज्य करु लागले. स्थानिक नेटिव काळे लोक आळशी व अकुशल होते. गो-या लोकांना व्यापारी पिकांच्या मशागती साठी हिंदुस्तान माून कुशल व कष्टाळू भारतीय मजूरांची नितांत आवश्यकता भासू लागली. त्यासाठी त्यांनी हिंदुस्तानातुन करारावर मजूर आयात करण्यासाठी इंग्लैंड मधील गव्हर्नर कडे मागणी केली. या करारामुळे गिरमिटिया मजूरांचे तांडे दक्षिण अफ्रिकेच्या तीरावर धडकू लागले. आरोग्य विभागाचे प्रमाण-पत्र मिळाल्या शिवाय या मजूरांना दक्षिण अफ्रिकेच्या भूमिवर फिरण्यास बंदी होती. त्यामुळे दूरचा प्रवास करुन आलेल्या भारतीय मजूरांचे अतिशय हाल झाले. गोरे लोक या भारतीय मजूरांना रेल्वे, शेती, हॉटेल व घर कामासाठी ठेवू लागले. मजूरांची निवड करताना गाय, म्हैस, घोडे यांच्या निवडी प्रमाणे परीक्षण होऊ लागले. एखादया मजूराला ग्राउंडवर न थांबता पळविले जात असे. मजूरांचे दंड, स्नायु, मांडया तपासून नंतरच मजूरी ठरली जाऊ लागे. अंगात ताप असताना सुदा काम केले तरच मजूरी मिळत असे. या भारतीय मजूरांना मतदानाचा हक्क नव्हता. महात्मा गंधधी वयाच्या 24 व्या वर्षी नेटाल येथे दादा अब्दुल्ला अँड कंपनीत एका वर्षाकरीता 24 मई 1893 रोजी नियूक्त झाले. लंडन येथून बॅरिस्टर पदवी प्राप्त झाल्यानंतर दक्षिण अफ्रिकेतील डर्बन येथे कोर्टरुम पाहिण्यासाठी गांधी गेले होते. गो-या न्यायाधीशांने त्यांना गुजराती पगडी डोक्यावरुन खाली उतरवून घेण्याची आज्ञा केली. भारतीय संस्कृति व परंपरेनुसार पगडी उतरवणे अपमानास्पद समजले जाई त्यामुळे महात्मा गांधी यांनी न्यायाधीशांची आज्ञा ठोकरुन कोर्टा बाहेर जाणे पसंत केले. या विषयी त्यांनी स्थानिक वतर्मानपत्रात निवेदन लिहिले. प्रिटोरियाला जाताना पिटर मेरिटस बर्ग रेल्वे स्टेशन वर त्र्ॅरू]हृõ क्लास डब्यात शिरताना गांधीना गो-या लोकांनी सामानासहित प्लेटफॉर्मवर फेकून दिले. त्याकाळी काळया लोकांनी फस्ट क्लास मये प्रवास करणे अपराध समजला जाई . प्रेसिडेंट क्रूगर यांच्या महालासमोरील फूटपाथ वर चालताना पाहून तेथील पोलिसांनी पकडून महात्मा गांधी यांना झोडपले. अशा अनेक प्रसंगातून महात्मा गांधी यांचा पदोपदी अपमान व अवहेलना झेलावी लागली. त्यांच्या मनात भारतीय बांधवासाठी करुणा निर्माण झाली. तेथील भारतीय मजूरांच्या हक्कासाठी त्यांनी कायदेशीर लढाई शुरु केली. या करीता नेटाल , ट्रांसवाल, डरबन, पीटर, मेरिट्जबर्ग , जोहान्सबर्ग , प्रिटोरिया अशा अनेक ठिकाणी भारतीय मजूरांना संघटित केले. महात्मा गांधी यांच्या या चळवळीमुळे भारतीय मजूर जात, धर्म , भाषा विसरुन केवळ भारतीय या नात्याने एकत्र येऊ लागले.
भारतीय ज्ञानपीठ नवी दिल्ली यांनी लोकोदय ग्रंथमाले अंतर्गत ही 904 पृष्ठांची भव्य कांदबरी 1999 रोजी प्रकाशित केली आहे. लेखकाने ही कांदबरी प्रकाशित करताना आलेल्या आर्थिक व राजकीय अडथळयांचे वर्णन आपल्या भूमिकेत केले आहे. त्यांचा विशेष राग भाजपा व काँग्रेस वर आहे. समाजवादी पक्षाचे श्री मुलायमसिंग यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले आहेत. इलेक्ट्रॉनिक मिडियेतील नयन-कर्ण सुखाच्या निद्रेत ही हजार पृष्ठांची कांदबरी व ती सुदा महात्मा गांधीवर आधारित कोणी वाचक संपूर्ण वाचून काढेल अशी लेखकालाच खात्री नाही त्यामुळे त्यांनी संपूर्ण कांदबरी वाचणा-या पाठकांच्या प्रतिक्रिया अवश्य मागतिल्या आहेत.
पुणे विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर नामित सदस्य या नात्याने 2001साली एका बौठकीत ही कादंबरी मी बोर्डापुढे ठेवली. त्यावेळी काही प्रायापकांनी कांदबरी खुपच मोठी आहे हा बहाना केला. विद्याथ्र्यांना डोईजड होईल असाही युक्तिवाद केला गेला. परंतु महात्मा गांधी यांच्या आफ्रिकेतील जीवनावर हिंदी साहित्यात एवढा विस्तृत रुपात कोणीही लिहिलेले नाही. महात्मा गंधधी यांच्या या संघर्षाची कहानी नव्या पिढीला करुन देणे महत्वाचे वाटले. या कादंबरीत महात्मा गांधी यांनी दक्षिण अफ्रिकेत प्रथमत: सुरु केलेल्या सत्याग्रह आंदोलनाचे वर्णन केलेले आहे. या आंदोलनात हिंदु-मुस्लिम व अन्य धर्माचे भारतीय एकजुट झाले. महात्मा गांधी यांच्या संघर्षाची ही कहाणी आजच्या नवीन पिढी समोर आली पाहिजे. हिंदी अभ्यास मंडळाचे तत्कालीन अयक्ष डॉ. शहाबुद्दीन शेख यांनी माझा प्रस्ताव स्वीकृत केला. डॉ.गिरिराज किशोर यांना पत्राने मी ही गोष्ट कळवली तेव्हा त्यांना फारच आनंद झाला. या कांदबरीची भुमिका मी मराठीत भाषातंरीत करुन सा.साधनात प्रकाशित केली व त्यांना कळवले तेव्हा त्यांनी साने गुरुजी यांनी सुरु केलेल्या साप्ताहिकात त्यांच्या कांदबरीची भुमिका मराठीत आल्या बद्दल आभाराचे पत्र पाठवले. यामुळे पुण्याचे सेवा निवृत्त हिंदी प्रायापक डॉ.पांडुरंग कापडणीस यांनी ही कांदबरी संपुर्णपणे मराठीत भाषातंरित केली आहे व लवकरच ती प्रकाशित होणार आहे.
महात्मा गांधी यांच्या विषयी अनेक भ्रम व दंतकथा पसरलेल्या आहेत. त्यामुळे ऐतिहासिक कागदपत्रांचा आढावा घेऊन लेखकाने दक्षिण अफ्रिकेचा प्रवास केला आहे. मोहनदास गांधी हा एक अत्यंत सामान्य व्यक्ती होता परंतु दक्षिण अफ्रिकेतील अपमान, अवहेलना झेलून महात्मा गांधी यांच्या व्यक्तीमतवाला महात्मा ही पदवी का प्रदान झाली हे समजते. दक्षिण अफ्रिकेतील गांधी साहित्याचे अभ्यासक श्री हासिम-सीदात म्हणतात की च् मला या गोष्टीचा सर्वात मोठा गर्व आहे की जगातील सर्वात मोठा व किंमती हिरा दक्षिण अफ्रिकेतील खाणीत आम्हाला सापडला पंरतु गांधी नावाचा पाणीदार हिरा े आम्ही तुम्हा भारतीयांना दान दिला.छ श्री हासिम-सीदात डरबन येथे वरिष्ठ अॅटरनी व लॉ सोसयटीचे पहिले अफ्रिकन भारतीय पदाधिकारी आहेत.
लेखक आपल्या भुमिकेत लिहितात की दक्षिण अफ्रिकेचा प्रवास केल्यानंतर असे जाणवले की आपण मोहनदास पक्षावर व त्यातल्या त्यात दक्षिण आफ्रिकेतील म. गांधीवरच कादंबरी लिहिली पाहिजे. दक्षिण आफ्रिका महात्मा गांधी यांच्या स्मृतीने वेढलेली आढळली. महात्मा गांधी हे स्वातंत्र्य संघर्षातील संघर्ष-पुरुष होते, यात मुळीच संशय नाही. परंतु मोहनदास हा एक सर्वसामान्य माणसाच्या संवेदना व अनुभव यांच्या सर्वात जवळचा दुवा आहे. आगामी पिढीला मोहनदासाची जास्त गरज आहे, कारण त्यामुळे तिला समजेल की मोहनदास महात्मा गांधी कसा बनला. गांधी एक नौतिक-पुरुष असून ते समाजपुरुषसुदा आहेत, जे आपली कमजोरी कोठेही लपवत नाहीत. आपल्या चुकांची जाणीव, मोठे होण्याचे द्वार असते. या सर्व भटकंतीतून मला साक्षात्कार झाला की काही लिहिण्यापूर्वी संबंधित स्थळ, शहर, सडक या सर्वांना पाहणे किती आवश्यक ठरते. यातूनच प्रचंड रचना आकारास येत असते. नवीन विश्वाची निर्मिती करता येते. मोहनदासचा हा सर्व संघर्ष एका पराधीन भूमीवर कोणा अज्ञात सामान्य माणसासाठी केलेला संघर्ष होता. प्रत्येक विस्थापित व्यक्तीला संघर्ष हा करावा लागतोच, मग भले तो आपल्या देशातील असो अथवा परदेशातील. देशकालानुरुप यामये तीव्रता व गुणात्मक फरक असू शकतो. प्रत्येकजण आपल्या जीवनात र्निधारित, अर्निधारित अथवा अल्प र्निधारित लक्ष्याकडे वाटचाल करीत असतो. त्याकरिता तो त्याग करतो. यातना सहन करतो व काही स्वप्ने पाहतो. मोहनदासाचा उद्देश र्निधारित संघर्ष नव्हता. मी तर म्हणेन की काफिला पुढे जात राहिला व मुक्कामाचे ठिकाण स्पष्ट होत गेले. महात्मा बनण्याचा त्यांचा मार्ग हा अशाच अनिश्चित त्याग, संघर्ष, पीडा, अपमान या अरुंद वाटांतूनच पार होत गेला. महात्मा बनणे ही आंतरिक विकासाची शेवटची पायरी आहे. ही बाब सर्वच ठिकाणी लागू होते. एक महात्मा जेथे खुले पुस्तक आहे, तेथे ती एक अज्ञात पोथीसुदा आहे. खरे पाहता प्रयत्न व संघर्ष यातूनच कथा निर्माण हेधत असते . उपलबीचे शिखर दुरुन डोळयांना दिसते परंतु कथा ही नेहमी संघर्षाची असते.
श्री शौलेश मटियानी आजारी आहेत परंतु स्वस्थ होते तेव्हा म्हणायचे ... च् गिरिराजजी , गांधीची काठी लागली पाहिजे एकदा का तिचा स्पर्श झाला की कादंबरी लगेच पूर्ण होईल! छ
ही कांदबरी नव्या पिढीने जरुर वाचली पाहिजे म्हणजे त्यांना कळेल की दक्षिण आफ्रिकेतील गांधीगिरी काय होती.



पहला गिरमिटिया लेखक - डॉ. गिरिराज किशोर

प्रकाशक-
भारतीय ज्ञानपीठ
18 इन्स्टीटयूशनल एरिया
लोधी रोड, नवी दिल्ली - 110003
मुल्य - रु. 350/-
पहला गिरमिटिया

गिरिराज किशोर
पृष्ठ : 904
आईएसबीएन : 81-263-0760-9
प्रकाशित : अप्रैल २४, २००४

मराठी पाट्यासाठी केंद्र सरकारचे आदेश

गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राजभाषा विभागाने केंद्र सरकारी कार्यालया मध्ये प्रांतीय भाषेत अर्थात महाराष्ट्रातील सर्व कार्यालयात मराठीत पाट्या, सूचना फलक,ग्राहकांसाठी मराठी नमुन्यातील फॉर्म आदि सेवा देण्या बध्दल आदेश जारी केलेले आहेत.
राजभाषा विभागाच्या पत्र संख्या 14034/34/97-रा.भा. दिनांक 04-01-2002 नुसार स्थानिक जनतेच्या सुविधेकरीता केंद्र सरकारी कार्यालयात सर्व प्रकारचे फॉर्म, नोटीस बोर्ड, सूचना, विभागीय साहित्य आम जनतेच्या हितासाठी हिंदी,इंग्रजी बरोबर मराठीत सुध्दा उपलब्ध करुन देण्याचे धोरण ठरवून दिलेले आहे. यामागे केंद्र सरकारच्या त्रिभाषा सुत्राचा आधार आहे. काही विशिष्ट फॉर्म जे सरकारी कार्यालयातील अंतर्गत कामकाजासाठी आवश्यक आहे असे फॉर्म फक्त हिंदी व इंग्रजीत भरले जातील कारण केंद्र सरकारची राजभाषा हिंदी असून इंग्रजी ही सह राजभाषा आहे.
जनतेच्या उपयोगासाठी असणारे सर्व फॉर्म , सूचना,नोटिस बोर्ड यात क्रमानुसार मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेचा वापर करण्याची सक्ती आहे. परंतु हा नियमाची नेहमीच अवहेलना केली जाते. सर्वच सरकारी कार्यालयात ब्रिटीश राजसत्तेची इंग्रजी हीच भाषा प्रयोगात आणली जाते. केंद्र सरकार एका बाजुला त्रिभाषा सूत्राचा पाठपुरावा करीत आहे व सर्वच भारतीय भाषांचा विकास करण्यास कृतसंकल्प आहे. परंतु आज स्वतंत्र भारतात भारतीय भाषेच्या प्रयोगाकरीता संघर्ष करावा लागतो.
भाषेच्या राजकारणात नेहमीच भारतीय भाषेचा बळी जातो. इंग्रजीच्या वर्चस्वाबद्धल कोणीच काही ब्र शब्द उच्चारीत नाही कारण सर्वसामान्या पेक्षा राजकारणी,संस्थाचालक,नोकरशहा व शहरी लोक इंग्रजीला शरण गेले आहेत. अशावेळी भारतीय भाषेचा विकास करण्याची जबाबदारी भारतीय भाषा प्रेमी यांची आहे.

राष्ट्रभाषा


भारतीय भाषा परिवारात संस्कृतचे स्थान मातेचे तर इतर सर्व भाषेचे स्थान भगिनींचे आहे. यात हिंदी सर्व भारतीय भाषेची मोठी बहिण आहे. भारतीय जनगणना 1991 न्वये हिंदी भाषिकांची संख्या एकूण भारतीय लोकसंख्येच्या 40.20 इतकी आहे. केंद्रीय भारतीय भाषा संस्था म्हैसूर यांच्या आकडेवारीनुसार व जनगणना 1991 मधील सर्वेक्षणानुसार इतर भारतीय भाषेचे टक्केवारी मराठी-7.50, बंगाली-8.30,तेलुगु- 7.90, तमील-6.30, कन्नड-3.90, मल्याळी- 3.60, पंजाबी- 2.80, उडिया- 3.30, गुजराती- 4.90, उर्दू-5.20, असामी-1.40 इतकी आहे. भारतीय घटनेतील आठव्या परिच्छेदात एकूण 22 राष्ट्रीय भाषेचा सामावेश केलेला आहे. याशिवाय इतर 844 वेगवेगळ्या बोली भाषा भारतात अस्तित्वात आहेत.
विकीपीडिया ज्ञानकोषात सी.एम.बी.ब्रान यांच्या व्याखेनुसार कोणत्याही देशाची राष्ट्रभाषा निश्चित करण्याकरीता खास चार गुणांचा सामावेश असणे आवश्यक आहे. ते गुण म्हणजे- 1) ती भाषा त्या देशाची प्रादेशिक भाषा अथवा विशिष्ट प्रदेशातील लोकांची भाषा असावी 2) क्षेत्रीय भाषा जी त्या देशातील विशिष्ट क्षेत्रात उत्तर,दक्षिण वगैरे भागातील असावी 3) सर्वसाधारण संपुर्ण देशात बोलली व समजली जाणारी भाषा किंवा जनसमूहाची भाषा 4) केंद्रीय भाषा जी त्या देशातील सरकारी कामकाजाकरीता एक राष्ट्रीय ओळख या नात्याने वापरली जाते. शेवटच्या दोन गुण विशेषांमुळे बहुतेक भाषा या त्या देशाची वास्तविक अथवा कायदेशीर राष्ट्रीय भाषा ठरते.
15 ऑगस्‍ट 1947 पूर्वी हिंदीला राष्‍ट्रभाषा म्‍हणूनच संबोधले जात होते. स्‍वातंत्र्य चळवळीत महात्‍मा गांधी यांनी सत्‍य, अहिंसा, खादी, असहकार या बरोबर हिंदी भाषेचा वापर राष्‍ट्रीय भावना संपूर्ण देशात जागृत करण्‍यासाठी केला होता. कलकत्‍ता येथील कांग्रेस अधिवेशनात त्‍यांनी लोकमान्‍य टिळक यांच्‍या इंग्रेजी भाषेबद्दल स्‍तूती केली परंतु त्‍यांनी टिळकांना सल्‍ला दिला की येथून पुढे काग्रेस च्या मंचावर फक्‍त हिंदी भाषेत भाषण दयावे ज्‍यामुळे सर्व सामान्‍य कांग्रेस कार्यकर्ता अधिक सक्रिय होऊ शकेल.
महात्मा गांधी हिंदी आंदोलनाचे प्रमुख नेते होते. त्यांची मातृभाषा गुजराती होती. देशाच्या अखंडते करीता व देशाला एक सूत्रात बांधणारी राष्ट्रभाषा हिंदी हीच सर्वश्रेष्ठ भाषा आहे हे त्यांनी सर्वच भारतीयांना पटवुन दिले. 20 आक्टोबंर,1917 रोजी त्यांनी भडोच येथे द्वितीय गुजरात शिक्षण संमेलनात राष्ट्रभाषा संकल्पना मांडली. ते म्हणतात-
1. ती भाषा सरकारी नोकरी करीता सहज समजणारी पाहिजे.
2. त्या भाषेमुळे भारतातील अंर्तगत धार्मिक,आर्थिक, व राजकिय कामकाज शक्य व्हावे.
3. ही भाषा देशातील बहुसंख्य लोग बोलणारी असावी.
4. ही भाषा राष्ट्राकरीता सोपी असावी.
5. या भाषेचा विचार करताना क्षणिक व तात्पुरता विचार केला जाऊ नये.
या पंचसूत्राचा विचार करता त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषा का संबोधले हे ध्यानात येऊ शकते.

भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने डॉ.विमलेश कांती वर्मा द्वारा लिखित हिंदी और उसकी उपभाषाएं पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांनी सरकारी आकडेवारीच्या आधारे हिंदी भाषेचा सर्वेक्षण रिपोर्ट सादर केलेला आहे. द केम्ब्रिज इनसाइक्‍लोपीडिया आफ लैंग्वेज अनुसार प्रथम वीस भाषेत हिंदीचा चौथा क्रमांक तर तसेच लोकसंख्‍ये अनुसार हिंदीचा तिसरा क्रमांक आहे. परंतु यात बिहारी बोलणा-या 6.5 करोड लोकांना जोडले तर मातृभाषा या नात्याने हिंदी जगात तिस-या क्रमांकाची भाषा आहे. भारतात द्विभाषिक स्थिति मुळे अनेक प्रातांत हिंदी ही दूसरी भाषा या नात्‍यांने प्रचारात आहे. महाराष्‍ट्रात मराठी नंतर हिंदी समजणारे 86.17 लोक हिंदीचा उपयोग करतात. भारतीय भाषा परिवारात हिंदी भाषा द्वितीय भाषा म्हणून मोठया प्रमाणात सर्वत्र वापरली जाते
कोलकोता येथील कार्पोरेशन बँकेचे वरिष्ठ अधिकारी डॉ.जयंतीप्रसाद नौटियाल यांनी हिंदी भाषेच्या प्रसारावर संशोधन करुन आपला प्रबंध सादर केलेला आहे. त्यांच्या या प्रबंधात त्यांनी जागतिक आकडेवारीनुसार हे सिध्द केले आहे की हिंदी ही जगातील प्रथम क्रमाकाची भाषा आहे.त्यांनी ही आकडेवारी वर्ड अलमेनिक वरुन घेतली आहे. तसेच विविध देशातील दूतावासातील अनेक वरिष्ठ सचिवांकडून त्यांनी आकडेवारी गोळा केली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार चीन मध्ये अनेक बोली भाषा असुन त्यांचा सामावेश मंदारीन भाषेत केलेला आहे. चीन मध्ये अनेक बोली भाषिक दुसरी बोलीभाषे पासुन अनभिज्ञ आहेत. हिंदी समजणारे जगात एक अरब पेक्षा जास्त लोक आहेत जे जगातल्या अनेक देशात विभागले गेले आहेत. जगातील भाषातज्ञ हिंदीतील खडीबोलीलाच हिंदी भाषा मानतात परंतु हिंदीत अनेक बोली भाषा आहेत. उर्दूचे व्याकरण हिंदी भाषेवर आधारित आहे. ती शुध्द भारतीय भाषा आहे ज्यात काही अरबी फारसी शब्द आहेत. हिंदी जाणणारे कोणीही उर्दू भाषा सहजपणे समजू शकतात. पाकिस्तानात सिंधी,बलुची,अफगाणी या भाषा आहेत परंतु फाळणीत पाकिस्तानात भारतीय मुसलमान आपली भारतीय भाषा उर्दू तिकडे घेउन गेले. उर्दू राजकिय आश्रयामुळे तेथील स्थानिक भाषा नसुन सुध्दा राष्ट्रीय भाषा होऊ शकली. हिंदी समजणारे या देशात 80 टक्के लोक आहेत. इंग्रजी समजणारे फक्त 3 टक्के लोक आहेत. जगात इंग्रजीची टक्केवारी 4.85 इतकी आहे.

14 सप्‍टेंबर 1949 रोजी भारताने केंद्र सरकारच्या सर्व प्रशासकिय कामकाजा करीता हिंदी भाषेचा स्‍वीकार राजभाषा या नात्याने केला आहे. घटनेतील कलम ३४३ न्वये देवनागरी लिपित लिहीली जाणारी हिंदी भाषा राजभाषा आहे. हिंदीच्या संदर्भात १९४८ रोजी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी भारतीय घटना सभेत नॅशनल लैंग्वेज (राष्ट्रभाषा) व स्टेट लैंग्वेज (राजभाषा) शब्दांचा वापर केला. घटना समितीने स्टेट लैंग्वेज करीता हिंदीत राजभाषा हा अनुवाद केला आहे. यावर काही विद्वानांनी विरोध केलेला आहे.स्टेट लैंग्वेज ऐवजी ऑफिशियल लैंग्वेज हा शब्द स्वीकार केला गेला. ऑफिशियल लैंग्वेजचा प्रयोग अर्थात हिंदीचा प्रयोग सरकारी कामकाज,प्रशासन,लोकसभा व राज्यात विधान सभेत व न्याय पालिकेत स्वीकार्य केला गेला आहे.
14 सप्टेबंर,1949 रोजी म्हणजे घटना अस्तित्वात येण्याअगोदरच तत्कालीन प्रबुद्ध राजकिय नेत्यांनी हिंदीचा स्वीकार केला. याच दिवशी भारतीय घटना सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांचे समारोपाचे भाषण झाले. त्यात त्यांनी हिंदी विषयी मार्गदर्शक चिंतन व्यक्त केले आहे. ते म्हणतात की आमच्या देशाच्या इतिहासात आतापर्यंत कधीच एका भाषेला सरकार दरबारी व प्रशासनात मान्यता मिळाली नाही. मला विश्वास आहे कि हिंदी भाषा अन्य भारतीय भाषेतील चांगली ग्राह्य गोष्टी स्वीकारील ज्यामुळे तिची अधोगती नाही तर विकासच होणार आहे. राजभाषा हिंदीच्या लोकसभेतील त्या चर्चेमुळे अनेक प्रांतात फूट पडू शकली असती परंतु तत्कालीन नेत्यांनी संयमाने व अभ्यासपूर्ण भाषणांनी लोकसभा जिंकली. एका केंद्रीय भाषेमुळे आपल्यातील अंतर दूर होईल. आमचे संबंध घनिष्ट होतील कारण आपली परंपरा,संस्कृती व सभ्यता एक आहे.
भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने डॉ.विमलेश कांति वर्मा द्वारा संपादित लोकसभेतील भाषणांच्या संकलीत कागदपत्रांवर आधारीत हिंदी राष्ट्रभाषा से राजभाषा तक प्रकाशित केले आहे.यात सर्वच नेत्यांच्या भाषणांचा वृत्तांत आपणास वाचता येईल.

घटनेतील कलम ३५१ अत्यंत महत्वपूर्ण आहे. यात केंद्र सरकारने राजभाषा हिंदी शब्दाचा वापर न करता हिंदी शब्दाचा वापर केला आहे. या कलमात स्पष्ट केले आहे की भारतातील एकजीव संस्कृतीच्या सर्वच अभिव्यक्तींचा माध्यम या नात्याने हिंदीचा विकास करावा. त्या भाषेचा आत्मा न बदलता या भाषेत हिंदुस्तानी (जी भाषा म.गांधी यांना अभिप्रेत होती ज्यात उर्दू व संस्कृत भाषेचा समान वापर केलेला आहे) व घटनेतील आठव्या परिच्छेदातील सर्व भारतीय भाषांच्या ( ज्या आज मितीला २२ आहेत) प्रचलित शब्दांना आत्मसात केले जावे. अन्य भारतीय भाषेचे रुप,शैली,व पदावलीचे अनुकरण करुन मुख्यत संस्कृत व अन्य सर्व भाषेचे ( यात जगातील सर्व प्रचलित भाषा ज्यात इंग्रजी सुध्दा अंतर्भुत असेल) शब्द ग्रहण करुन हिंदी भाषा समृद्ध करावी. यामुळे हे स्पष्ट होते कि भारतात हिंदी ही भाषा कोणत्याही विशेष प्रदेशाची मक्तेदारी नाही. ती जशी महाराष्ट्राची आहे तशी ती तमीळ जनतेचेची सुध्दा आहे.
स्वातंत्र्य चळवळीत हिंदीचा उल्लेख हा तत्कालीन सर्वच राजकिय नेत्यांनी राष्ट्रभाषा हाच केला आहे. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने वर्धा येथे राष्ट्रभाषा प्रचार समितिची स्थापना केली गेली. आज वर्धा येथे केंद्र सरकारने जगातील पहिले महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापन केले आहे. या विद्यापीठाचे स्थलातंर काही उत्तरेतील प्राध्यापक वर्ग दिल्ली करणार होते परंतु राष्ट्रभाषा प्रचार समितिच्या प्रयत्ना मुळे ते तहकुब झाले. मा.मधुकर राव चौधरी यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या भूमिवर केंद्र सरकारचा हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभा राहीला आहे. त्यांनी नागपुर येथे पहिले आंतराष्ट्रीय हिंदी सम्मेलन 10 जानेवारी,1975 रोजी आयोजित केल्यामुळे आज जगात सर्वत्र व सर्व दूतावासात 10 जानेवारी हा विश्व हिंदी दिवस पाळला जातो. 14 सप्टेबंर 1949 रोजी राजभाषा हिंदी स्वीकारल्या मुळे केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयात 14 सप्टेबंर हा हिंदी दिवस पाळला जातो. याचे श्रेय सुध्दा वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समितीलाच आहे.
आज मनोरंजनाच्या क्षेत्रात हिंदीला तोड नाही. मुंबईच्या बॉलीवुड मधुन हिंदी वगळली तर व्यवसाय किती होईल हे गणित तपासले पाहिजे. गुजराती कलाकार परेश रावल,संजीव कुमार, बंगाली कलाकार शर्मिला टागोर,मिथुन चक्रवर्ती,मराठी कलाकार नाना पाटेकर, लता,आशा या विविध प्रांतातील कलाकारांनी हिंदी चित्रपटात आपला प्रभाव राष्ट्रीय स्तरावर पोहचविला आहे. राजकारण करण्याकरीता प्रांतीय अस्मिता ठीक आहे परंतु जर देशाचा विचार करणार असाल तर हिंदीला पर्याय नाही. अमेरीकेवर दहशती हल्ला झाल्यानंतर राष्ट्रीय सूरक्षा योजने अंतर्गत तेथे अरबी,चीनी बरोबरच आता हिंदी करीता सुद्धा करोडों डॉलरच्या भाषा शिक्षणाच्या योजना अस्तित्वात आल्या आहेत. पुणे येथील सी-डॅक या संस्थेने जिस्ट व आर्टफेशियल इंटलिजंस अंतर्गत हिंदी व अन्य भाषा विकास योजना हाती घेतल्यामुळे देशात माहिती तंत्रज्ञानात भारतीय भाषेचा मार्ग सुकर झाला. या संस्थेने हिंदी भाषा शिकण्याकरीता लिला योजना यशस्वी केली आहे. इंग्रजी माध्यमातुन हिंदी शिकवणारे हे सॉफ्टवेयर जगात प्रसिद्ध आहे. याच संस्थेने यांत्रिक अनुवाद करणारे इंग्रजी-हिंदी सॉफ्टवेयर मंत्रा (मशीन असिस्टेड ट्रांसलेशन) हे अमेरिकन सरकारने जागतिक वारसा या अंतर्गत संग्रहित केले आहे.
हिंदी संमेलन,परिसंवाद,कार्यशाळा याकरीता जेव्हा कधी उत्तर भारतात जावे लागते तेव्हा तेथील लोक महाराष्ट्राच्या विकासा बध्दल प्रशंसा व्यक्त करतात. राष्ट्रभाषा हिंदी प्रचारातील महाराष्ट्राचे योगदान ते मान्य करतात. जाज्वल्य राष्ट्रभक्ती साठी महाराष्ट्रातील विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, महात्मा फुले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, कर्वे यांचा आदराने उल्लेख केला जातो. 1857 चा उठाव असो किंवा 1942 ची चले जाव चळवळ असो या सर्वच राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राचे नांव अग्रभागी आहे. राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचे नांव सर्वच भारतात आदराने घेतले जाते.
हिंदीत रोजगाराच्या अनेक वाटा आहेत. यात अनुवाद, पत्रकारीता, दूरदर्शन,चित्रपट,जाहिरात,विपणन,व्यापार,पर्यटन,धार्मिक संस्था इ. अनेक क्षेत्रात महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. परंतु बेरोजगार युवकांची माथी हिंदी विरोधात पेटवून राष्ट्रीय ऐक्याला तडा जाणारी वक्तव्ये टाळावीत. पुरोगामी महाराष्ट्रात आज जर हिंदीला विरोध होणार असेल तर या सारखे दुसरे दुर्दैव नाही. घटनेत हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे. परंतु राष्ट्रभाषा हा शब्द कोठेच नाही. जनतेत गैरसमज पसरविणे सोपे आहे परंतु प्रामाणिकपणे देशाची राष्ट्रभाषा ठरविणे खुपच कठीण काम आहे. आज अमेरिकेत सुद्धा इंग्रजी राष्टभाषा होण्यासाठी सिनेटच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. याचा अर्थ इंग्रजी तेथे महत्वाची भाषा नाही असा होत नाही. लोकशाहीत सर्वसम्मती प्राप्त होणे आवश्यक असते. जगात आज अनेक प्रमुख भाषा राष्ट्रभाषा घोषित होण्यासाठी संघर्षरत आहेत.

क्याप - डाव्या विचारांचा खोलपणा की फोलपणा ?




भांडवलशाही उद्योगपतीच्या कंपनीची समाजवादी जाहिरात टी.व्ही वर पाहून करमणुक झाली.  वोल्टास ए.सी मशीनच्या जाहिरातीतील शेत मजुराची छोटी मुलगी मालकाच्या बंगल्यात डबा घेऊन जाते.  एसी विण्डो समोर डबा उघडा धरुन त्यात थंड हवा पकडते.  ही  थंड हवा ती शेतावर राबणा-या आपल्या शेतमजूर बापाच्या तोंडावर सोडते.  जाहिरात कलात्मक आहे.  कल्पना छान आहे.  परंतु एसी मशिन घेण्याची ऐपत मजूराकडे कोठून येणार ही गरीब लोकांची जीवघेणी थट्टा आहे.
            जागतिक करणाच्या प्रचंड चक्राखाली समाजवादी कम्यूनिस्ट चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संयुक्त रशियाचे विघटन भांडवली अमेरिकन कंपन्यांशी स्र्पाध करणारी चीनच्या माओवादी कंपन्या यामुळे कम्यूनिस्ट चळवळीच्या मुलभूत विचार सरणीला प्रचंड हादरा बसला आहे.  कामगार चळवळीत उतरलेल्या स्वार्थी राजकिय नेतृत्वामुळे आचार संहितेची वाट लागली आहे.  गरीब शेतकरी व कामगाराच्या हिताच्या  गोष्टी सभेत बोलायच्या परंतु कुटुंब व नाते संबंधाकरीता जमीन व कारखान्याचे आर्थिक शोषण सत्तेवर आले की तहहयात करायचे.
                        हे सर्व आठवण्याचे कारण  म्हणजे स्व. मनोहर शाम जोशी यांची साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी क्याप ।  हिंदीतील  या सुप्रसिद लेखकाने प्रेस, रेडियो, टी.व्ही वृत्तचित्र, वर्तमान पत्र मासिक या सर्वच क्षेत्रावर आपल्या प्रतिभेची छाप सोडलेली आहे.  केंद्रीय माहीती सेवा, टाईम्स ऑफ इंडिया, साप्ताहिक हिंदुस्तान आदि मिडियात काम करताना त्यांनी टी.व्ही धारावाहिक  हम लोग लिहिण्याकरीता 1984 साली संपादकाची खुर्ची सोडली. मनोहर शाम जोशी यांचा जन्म 9 ऑगस्ट 1933 रोजी अजमेर येथे झाला. त्यांचे शिक्षण अजमेर व लखनौ येथे झाले आहे. विज्ञानाचे स्नातक ,शास्त्रज्ञ व्हायचे परंतु साहित्याच्या आवडी मुळे लेखक झाले.इंग्रजी व हिंदी या दोन ही भाषेवर समान पकड त्यामुळे हिंदी साप्ताहिक हिंदुस्तान बरोबरच इंग्रजी साप्ताहिक वीक अँड रिव्ह्यू ,मॉर्निंग इकोचे संपादन प्रभावीपणे केलेले आहे.  दूरदर्शन धारावाहीकेचे जनक मनोहर शाम जोशी यांनी हमलोग,बुनियाद,मंुगेरीलाल के हसीन सपने, जमीन-आसमान,शाया इत्यादी  धारावाहीकांचे लेखन करुन मयम वर्गीयांच्या व्यथा,संवेदना प्रभावीपणे शब्दबद केल्या आहेत. हिंदी भाषेच्या नव नविन फॉर्मात लिहिताना त्यांनी व्यंग शौलीत चिमटे काढीत संवेदनेच्या अभिव्यक्तीला त्यांनी एका उंचीवर पोहचविले आहे.
                        क्याप कादंबरी ही एका कम्यूनिस्ट चळवळीकडे आकर्षित झालेल्या हिमालयातील वाल्मीकीनगर जिल्हयातील  अस्पृश्य डुम जातीतील साधारण माणसाची आहे.  कस्तुरीकोट या काल्पनिक संस्थानातील हा एक  उत्तराचंलातील  प्रदेश आहे.  उत्तर आधुनिकतेतील  मिडियाग्रस्त ढोंगी समाजाची  त्यांनी  खिल्ली उडवली आहे.  टी.व्ही व वर्तमान पत्रात छापलेल्या बातम्यांवर आपला पिढीची वाढ होत आहे.   याकरीता लेखक  च् हमारे उपवन में यहां से वहाँ तक भूल के ही फूल खिले है  या सारखी सुंदर प्रतिमा  योजतात.  क्याप  या गढवाली शब्दाचा समान हिंदी अर्थ स्पष्ट करण्याकरीता लेखक अजीब-सा, अनगढ-सा, बेकारसा, अनदेखा-सा, निराशाजनक शब्दांची योजना करतात.
                        क्याप ही एका डूम हरिजन प्रियकर व  उत्तरा नावाच्या ब्राम्हण मुलीची फसलेली प्रेमकथा आहे.  कम्यूनिस्ट क्रांतीची स्वप्ने पाहणारा डुम समाजातील ढोंगीपणामुळे निराश झालेला आहे. च्क्रांती  लिहा, क्रांती बोला, क्रांतीचे भजन करा परंतु क्रांती करु नका सारखी निराशजनक टिप्पणी कांदबरीचा नायक  करतो.  तो म्हणंतो की  कम्यूनिस्ट नेते व गरीब जनते  मधील दरी लांब वाढत आहे.  कम्यूनिस्टांनी  गरीबात जाऊन गरीबा प्रमाणे राहिले पाहिजे.  गरीबांना त्यांचे दु:ख समजुन घेणारे नेते हवे आहेत.  डाव्या विचारसरणीचा मी एक बुदीजीवी नेता आहे.  परंतु मला नेहमीच असे जाणवले आहे की आम्ही डाव्या विचारांची माणसे कॉफी हाऊस मये सिगार ओढीत  इंग्रजी पत्र पत्रिकेतील छापलेले लेख व कम्यूनिस्ट ग्रंथातील उदाहरणे तोंडावर फेकण्यात तरबेज झालो आहोत.  आमच्यात व ब्राम्हणात काय फरक राहिला आहेआमचे ब्राम्हण सुद्धा धर्म ग्रंथातील संस्कृत श्लोक घोकुन घोकुन शास्त्रार्थ करतात.  आम्ही डाव्या विचारांचे तथाकथित बुदीवादी नेते फुकटचे मिळणारे मिष्टान्न खाऊन ढेर पोटया ब्राम्हणा सारखे बनत चालेलो आहोत.
लेखक स्वत: पत्रकार असल्यामुळे सामाजिक व राजकिय परिस्थितीचे संपुर्ण भान कादंबरी लिहिताना ठेवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा गांधीचा जनसामान्या वरील पगडा त्यांनी बारकाईने टिपला आहे. कार्ल मार्कस  विश्वातील सर्व कष्टकरी शेतकरी व कामगारांच्या हिताच्या संकल्पना मांडतो. तरीही भारतीय जनसामान्यांना फक्त धोतर घालुन उघडा राहणारा महात्मा अधिक भावतो. ग्रामीण जनतेला तो आपल्यातील एक मित्र वाटतो. कार्ल माक्र्स भारतातील मातीत फार मोठा प्रमाणात रुजु शकला नाही. कार्ल माक्स्चा प्रचार करणारे कम्यूनिस्ट भारतीय समाजातील देशी मन ओळख शकले नाही.  कम्यूनिस्ट विचारांना भारतीय पेहराव दिला गेला नाही.  विचार श्रेष्ठ असतात परंतु आचरणात आणण्याकरीता येथील जमीनीत बीज रुजवावे लागते.  ही मेहनत घेणारी फारच थोडी मंडळी कम्यूनिस्ट चळवळीत आढळते.
लेखकाने कांदबरीच्या नायकाचे काका खीमराज यांचे कम्यूनिस्ट कार्यकत्र्याचे चरित्र वर्णन केले आहे.  काकांची साधी राहणी, कष्टकरी जनतेत समरस होणे व  कार्ल  माक्र्सच्या  विचारांचा प्रसार पहाडी प्रदेशात निष्ठेने करणे याचे सुंदर चित्रण केले आहे.     कस्तुरीकोटच्या खीमराव काकावर  अल्मोडाचे कॉम्रेड  पूरन चंद्र जोशी, लेनिन, स्टालिन, कार्ल माक्र्सच्या विचारांचा पगडा आहे.  पहाडी क्षेत्रातील गरीब र्निधन जनतेच्या लोकसंगीत, लोकगीतांचा उपयोग करीन खीमराज काका कम्यूनिस्ट विचारांचा प्रसार करतात.
ही संपूर्ण कादंबरी मनोहर श्याम जोशी यांनी गप्पा गोष्टीच्या स्वरुपात लिहली आहे.  कस्तुरीकोटच्या काल्पनिक उत्तरांचलातील पहाडी  लोकांच्या जीवनात गप्पागोष्टींना विशेष महत्व आहे लेखक म्हणतात की या गप्पांच्या सवयीमुळे येथील लोक आत्महत्या करण्यास भाग पाडण्या-या विषम परीस्थितीत सुदा जीवन सुखकारक करण्याची  धडपड करतात. 
या कादंबरीला साहित्य अकादमीचा 2006 वर्षाचा हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्य प्रकाराचा पुरस्कार मिळाला आहे. हिंदी साहित्याची सेवा करणारा एक महान लेखक 30 मार्च,2006 रोजी स्वर्गवासी झाले आहेत. ते गेल्यामुळे आज त्यांच्याच भाषेत हिंदी वाचक म्हणतो की  सब कुछ क्याप लग रहा है ।

क्याप  लेखक- श्याम मनोहर जोशी
पृष्ठ: 151
 प्रकाशकवाणी प्रकाशन
आईएसबीएन: 81-7055-799-2
प्रकाशितमार्च २६, २००६

मोफत पाठयपुस्तकातील ज्ञानगंगा







महाराष्ट्र सरकारने शालान्त परीक्षेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व पाठयपुस्तके मोफत वाटण्याची घोषणा केली. ती अमलात आणेपर्यंत आता फक्त आर्थिकदृष्टया कमकुवत वर्गासाठीही लागू करण्याची घोषणा नुकतीच केली गेली आहे.


सर्व माध्यमिक विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके मिळणार, हे ऐकून हेवा वाटला. 25-30 वर्षांपूर्वी शाळांची स्थिती फारच वेगळी होती. आज बालवाडीच्या मुलाच्या दफ्तरात छान छान रंगीत पाठयपुस्तके आहेत. त्या काळी आम्ही चौथीपर्यंत पुस्तक व वहीचे दर्शन कधी घेतले नाही. नगरपालिकेच्या शाळेत त्या वेळी सर्वच गरीब कनिष्ठ वर्गातील मुले शिकत होती. धोतर, शर्ट, काळा कोट व टोपी घातलेले आमचे त्यावेळचे गुरुजी आम्हाला स्लेट पाटी (दगडी पाटी) वर अक्षरे गिरवायला लावायचे. या पाटीवरच मराठी, गणित, शास्त्र, चित्रकला या सर्व विषयांचे धडे गिरवले जात. 'धडे गिरवणे' या वाक्यप्रयोगातच पेन्सिल व पाटीचा संबंध पूर्वापार चालत आलेला असावा. खेडयातील लोक धुळाक्षरे गिरवीत. खेडयात धूळ चिक्कार. शाळाही बाहेर उघडया मैदानावर भरवली जात असे. त्यामुळे तेथील मातीच्या माणसांचा शिक्षणाशी संबंध आला, तोही मातीशीच.


प्राथमिक शाळेत त्यासाठी स्लेट पाटीचे अत्यंत महत्त्व होते. गावातील गुजराती दुकानदारा कडे स्लेट पाटी विकत मिळत असे. स्लेट पाटी घरी आणली की प्रथम ती पाण्याने स्वच्छ धुतली जाई. या पाटीवर शुभारंभ हा सरस्वती देवतेच्या मंत्राने होई. शाळेतील पहिला दिवस स्पष्टपणे आठवत नाही; परंतु स्लेट पाटीची कडी दोन बोटांत अडकून शाळेत जाणारी चिमुकली आकृती डोळयांसमोर येते. पहिल्या दिवशी प्रार्थना झाली की, पाटीवर रेखाटलेले सरस्वती मंत्र गुरुजींना दाखविले जाई. गुरुजींच्या पायावर डोके ठेवले की, शाळेतला पहिला दिवस सुरू होई. त्या काळी पाटी विकत घ्यायला काही पालकांकडे पैसे नसायचे. त्यांची मुले पाटी असलेल्या 'श्रीमंत' मुलांच्या शेजारी बसायची. त्या काळी पाटी घेण्याइतपत आमची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे माझ्या पाटीवर काही गरीब मित्रांनी शिक्षण 'शेअर' केल्याचे स्मरणात आहे.


माझ्या स्लेट पाटीवरील शिक्षणातील भागीदार मुस्लिम मित्र 'समद' त्या काळी यतीमखान्यात (अनाथालय) राहत होता. समद फारच खोडकर व दांडगाई करणारा माझा मित्र. एकदा आमच्या भांडणात त्याने माझी पाटीच फोडून टाकली. त्यामुळे घरी मला चांगलाच चोप मिळाला. ''पाटी नीट सांभाळता येत नाही का ? रोज नवीन पाटी घ्यायला आपण जहागीरदार आहोत काय ? आता बसा बिन पाटीचे!'' असे उद्गार वडिलांकडून महिनाभर ऐकावे लागले. आईच्या मागे सारखा लकडा लावल्यानंतर मला त्यांनी परत नवीन पाटी घेऊन दिली.


पाटी नव्हती तोपर्यंत समद व मी दोघेजण दुसऱ्या 'श्रीमंत' पाटीवाल्या मुलाशेजारी बसू लागलो. नंतर आपण केलेली चूक समदला कळून आली होती. माझ्या शाळेत सर्वच जातीधर्माची मुले होती. नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत तुम्हाला लहान मुलांमधील 'सर्वधर्मसमभाव' दिसून येईल. जेवणाचे डबे व पाटया सहकार पध्दतीने आणले जात. घरी आईला सांगितले की, माझ्या डब्यात दोन पोळया जास्तच घातल्या जात होत्या. काही वेळा गरीब भुकेल्या मित्रांसाठी चोरून खिशात बऱ्याच पोळया घडया करून नेल्याचे स्मरते. पाटीवर सतत गिरवल्यामुळे आमचे अक्षर सुधारले जाई. गुरुजी खुर्चीवर बसलेले व आम्ही बरेच विद्यार्थी सोडवलेले गणित त्यांना दाखवण्यासाठी पाटी घेऊन गर्दी केल्याचे दृश्य आठवते. त्या काळी सहामाही व वार्षिक परीक्षा पूर्ण पाटीवरच दिली आहे.


प्राथमिक शाळा सोडल्यानंतर माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला. त्या वेळी प्राथमिक शाळा या बहुतेक नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यामार्फत चालविली जात असे. माध्यमिक शाळेत जाताना सोबत पाटी नव्हती. त्यामुळे खूपच चुकल्याप्रमाणे वाटत राही. पाटी जाऊन त्या वेळी हातात वही आली. त्या वेळी दोनच वह्या होत्या. एक आखीव व दुसरी पूर्ण कोरी वही. आखीव वहीत सर्वच विषय व कोऱ्या पानाच्या वहीत चित्रकला व भूमितीला स्थान होते. या वह्याही नेहमी नवीन असतील, अशी शक्यता फारच कमी होती. बहुतेक वेळा मोठया भावाच्या, बहिणीच्या उरलेल्या वहीतील कोरी पाने वेगळी केली जात असत.


या 'शिळया' पानांची वही घरीच तयार केली जात असे. या जुन्या वहीच्या पुठ्ठयावर आम्ही देवांची सुंदर रंगीत चित्रे चिकटवत होतो. आता वह्यांवर क्रिकेट, कार्टून, निसर्गचित्रे, प्राणी, पक्षी यांची धम्माल गर्दी होत आहे. कॉलेजला जाताना याच वह्यांवर हिंदी सिनेमातील नटनटयांचे आकर्षक चित्रे झळकू लागली.


शालेय जीवनातील वह्यांच्या सर्वात मागील पानावर लिहिलेले साहित्य फारच मजेदार व अर्थपूर्ण असे. त्यातील काही नमुने- ''सराची पँट फाटकी आहे, सोन्याच्या नाकाला शेंबूड आहे, उद्या मी ट/ठ्ठपला जाणार आहे, कँटीनमध्ये मिसळ चांगली आहे, काळे सर क्रॅक आहेत; किंवा हिंदी मराठी गीतांमधीठ्ठल काही ओळी खरडलेल्या असत.'' सरांच्या ताब्यात वही जाऊ नये, याची कठोर खबरदारी घेतली जाई. वहीच्या प्रथम पानांवर श्रीगणेशाय नम: व अनेक देवतांना नमस्कार लिहिलेले असत. परंतु शेवटच्या पानावर चावट, वात्रट व विनोदी वाक्यांची रेलचेल!


'माध्यमिक शाळेत इंग्रजी व गणित ही दोनच पुस्तके आमच्या दृष्टीने महत्त्वाची होती. या दोन विषयांनी आम्हा सर्वांनाच खूप छळले आहे! ही दोन पुस्तके घरच्या मोठया भावंडाकडून प्रवास करीत आमच्यापर्यंत पोहोचत. या जुन्या पुस्तकांवर लाल पेन, पेन्सिल यांनी रांगोळी काढलेली व त्यामधून मूळ छापील गणित शोधणारे महाकर्म कठीण कार्य. यामध्ये गणितात चूक झाली की गुरुजी रागाने आमच्या वहीत लाल शाईचा भोपळा देत. फारच क्वचित प्रसंगी वहीत ''फारच छान, उत्तम, शाब्बास'' असा शेरा दैवयोगामुळे मिळत असे. अशा वहीचे प्रदर्शन संपूर्ण घरात व मित्रमंडळींत केले जाई.


शाळेतल्या लायब्ररीत पाठयपुस्तके क्वचित प्रसंगी दिली जात होती. गोष्टींच्या पुस्तकांची पेटी वर्गावर आली की आमची झुंबड उडत असे. सानेगुरुजी, विवेकानंद, शिवाजी महाराज, इसापनीती, पंचतंत्र, बिरबल, हातीमताई व जादूच्या पुस्तकांचा भरगच्च खजिना हाती पडत नसे. आज चौकाचौकात जून महिन्याच्या सुरुवातीला वह्या-पुस्तकांचे मंडप रुजू लागले आहेत. काही शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेमार्फत गणवेश, पुस्तके, वह्या सर्वच काही उपलब्ध होत आहे. त्याकरिता पालक भरपूर पैसे मोजतात. परंतु या सु)त सुविधेमध्ये शाळेतील शिक्षणाची जादू हळुहळू कमी होत आहे. आजचा विद्यार्थी सीडी, कॉम्)युटर, इंटरनेट व टीव्ही माध्यमातील पाठयपुस्तक व वह्यांच्या खऱ्या आनंदाला मुकला आहे.


बाजारातील जीवघेणी स्पर्धा, मार्कांचे तुंबळ युध्द, प्रवेश परीक्षेतील प्रचंड गोंधळ या सर्वच गदारोळात शिक्षणातील निरागस आनंद हरवला आहे. आज कोणी विद्यार्थी सार्वजनिक वाचनालयात वर्तमानपत्र, मासिक वाचत उभा असलेला दिसत नाही. लहानपणी आमच्या गावात मुलांसाठी चिमुकले पुस्तकांचे वाचनालय चालवले जाई. या वाचनालयात चांदोबा, वेताळ, कॉमिक पुस्तके वाचण्यात आमचा काही वेळ आनंदात पार पडे. वाचताना म्हातारेबाबा खारे शेंगदाणे, फुटाणे, गोळया, चॉकलेटही देत असत.


करिअर करण्याच्या लढाईत आपली तलवार, ढाल फक्त पाहिली जाते. परंतु सामूहिक शिक्षणातील निरागस, नि:स्वार्थी त्यागभावना शिक्षण क्षेत्रात लोप पावत आहे. आमचे शिक्षक आम्हा गरीब मुलांची मोफत शिकवणी घेत. वह्या-पुस्तकांची मदत केली जाई.


महाराष्ट्र सरकारने माध्यमिक शाळेच्या मुलांना पहिली ते दहावीपर्यंत मोफत वह्या व पाठयपुस्तके जरूर द्यावीत. यामुळे गरीब कुटुंबातील हुशार मुलांचे आशीर्वाद मिळतील.


सर्व शिक्षा अभियान, मूल तेथे शिक्षण, आश्रमशाळा, वस्तीशाळा, पार शाळा, साखर कारखान्यातील ऊस कामगारांच्या मुलांसाठी साखरशाळा, रात्रशाळा या सर्वच योजना यशस्वी झाल्या पाहिजेत. उद्याचा समर्थ भारत शाळेतील सुख-सुविधेवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाच्या हाती वही व पुस्तक असणे आवश्यक आहे!

क्षेत्रीय भाषा विकासा करीता केंद्र सरकारचे धोरण

                   गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राजभाषा विभागाने केंद्र सरकारी कार्यालया मध्ये प्रांतीय भाषेत अर्थात महाराष्ट्रातील सर्व कार्यालयात मराठीत पाट्या, सूचना फलक,ग्राहकांसाठी मराठी नमुन्यातील फॉर्म आदि सेवा देण्या बध्दल आदेश जारी केलेले आहेत.




राजभाषा विभागाच्या पत्र संख्या 14034/34/97-रा.भा. दिनांक 04-01-2002 नुसार स्थानिक जनतेच्या सुविधेकरीता केंद्र सरकारी कार्यालयात सर्व प्रकारचे फॉर्म, नोटीस बोर्ड, सूचना, विभागीय साहित्य आम जनतेच्या हितासाठी हिंदी,इंग्रजी बरोबर मराठीत सुध्दा उपलब्ध करुन देण्याचे धोरण ठरवून दिलेले आहे. यामागे केंद्र सरकारच्या त्रिभाषा सुत्राचा आधार आहे. काही विशिष्ट फॉर्म जे सरकारी कार्यालयातील अंतर्गत कामकाजासाठी आवश्यक आहे असे फॉर्म फक्त हिंदी व इंग्रजीत भरले जातील कारण केंद्र सरकारची राजभाषा हिंदी असून इंग्रजी ही सहराजभाषा आहे.


जनतेच्या उपयोगासाठी असणारे सर्व फॉर्म , सूचना,नोटिस बोर्ड यात क्रमानुसार मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेचा वापर करण्याची सक्ती आहे. परंतु या नियमाची नेहमीच अवहेलना केली जाते. सर्वच सरकारी कार्यालयात ब्रिटीश राजसत्तेची इंग्रजी हीच भाषा प्रयोगात आणली जाते. केंद्र सरकार एका बाजुला त्रिभाषा सूत्राचा पाठपुरावा करीत आहे व सर्वच भारतीय भाषांचा विकास करण्यास कृतसंकल्प आहे. परंतु आज स्वतंत्र भारतात भारतीय भाषेच्या प्रयोगाकरीता संघर्ष करावा लागतो.सराकारी कार्यालयात भारतीय भाषांच्या प्रयोगाकरीता सर्वच लेखक,साहित्यिक,कलाकार,पत्रकार,राजनेता व आम जनतेने आग्रही असायाला हवे. केंद्र सरकारी कार्यालयात हिंदी दिवस, हिंदी सप्ताह,पंधरवडा साजरा केला जातो तर महाराष्ट्रात राज्य सरकारने मराठी दिवस का साजरा करु नये. राज्य सरकारने तरी आपल्या कार्यालयातील सर्वच ठिकाणी मराठीच्या प्रसाराबध्दल जागरुक असावे. मराठीच्या विकासामुळे माहिती तंत्रज्ञानात देवनागरी लिपिचा विकास होईल व त्याचा फायदा संस्कृत,हिंदी,कोंकणी,नेपाळी,सिंधी भाषेचा होणार आहे. त्यामुळे मराठीच्या विकासात हिंदीला कधीच विरोध असणार नाही हे येथील राजकिय नेत्यांनी ध्यानात घ्यावे.


इतर भारतीय भाषेचा विशेषत: हिंदीचा विरोध केल्यामुळे मराठीचा विकास होईल व आपले राजकिय वजन वाढेल ही भाबडी समजुत काढून टाकण्याची आवश्यकता आहे. भारतीय भाषा विकसित होण्यात खरी अडचण इंग्रजी माध्यमातील सर्वच श्रीमंत वर्गाची होणार आहे. याबाबत मला तमिलनाडुतील प्रसंग आठवतो. चेन्नईत सरकारी कामा निमित्त गेलो होतो. तेथील कोडकंबक्कम उपनगरात मला राजस्थान पत्रिका व मिलाप हिंदी वर्तमानपत्रे वृत्तपत्र विक्रेत्याकडे मिळाली. तेथे त्याला तमिळ भाषेच्या स्थितीबध्दल विचारले तर त्याचे उत्तर बोलके होते. तो म्हणाला की तमिळनाडुतील राजकिय लोक हिंदीला विरोध करतात परंतु आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळेत इंग्रजी सोबत हिंदी सुध्दा शिकवतात व गरीब जनतेला सांगतात की आपल्या मुलांना फक्त तमिळ माध्यमात मुलांना पाठवा.आता तमिळनाडुत हिंदीचा विरोध कमी होत आहे व तो आश्चर्यकारक पध्दतीने महाराष्ट्रात वाढविला जात आहे. केवळ घटनेत,सरकारी कायद्यात हिंदीला राष्ट्रभाषा संबोधले नाही याचा अर्थ हा कधीच नाही की हिंदी या देशाची संपर्क,राज,व्यापार व्यवसाय भाषा आहे. ती सर्वच बाजुने राष्ट्रभाषा होण्यास न्यायपुर्ण भाषा आहे.

मुली

एक दिवस चौकातील पान ठेल्यावर गेलो. पान दुकानदार शेट्टी मंगलोरचा ज्याला सगळे अण्णा संबोधत होते. अण्णाची मुलगी बारावीला महाराष्ट्रात शास्त्र विभागात पहिली आली होती. अण्णा खाजगी नोकरी करुन पान ठेला चालवतो. त्याची मुलगी बुद्धीमान निघाली. घरची गरीबी ओळखुन सायकल वर सारडा कॉलेजला जाई व मन लावुन अभ्यास करी. याचे फळ तिला मिळाले. पुण्याला सरकारी इंजीनीयरिंग कॉलेजला चांगल्या गुणांमुळे प्रवेश मिळाला.
याच अण्णाच्या दुकानात प्रसिध्द कवि अशोक कोतवाल यांची कविता मुली ही वाचली. ही कविता कोणा रसिकाने कॅलेंडरच्या सुंदर आकर्षक रुपात छापून मोफत वाटली होती. कवितांचे कॅलेंडर निघावे हा त्या कविचा किती मोठा सन्मान. त्यावरील मोबाईल क्रमांकामुळे श्री.अशोक कोतवाल यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी आणखी काही कविता मला पाठवुन दिल्या. त्यांच्या काही कवितांचा मी हिंदी अनुवाद केला आहे. मराठी रसिकां साठी त्यांची मुली ही कविता देत आहे.

मुली

“ मुलीची जात “
हे शब्द उच्चारवत नाहीत मला !
मुली कशाही वागल्या
तरीही...

मुली मुलीच असतात !
किती तन्मयतेनं
त्या सजवित राहतात घर !
त्यांच्या नुसत्या असण्याने
बोलु लागतात भिंती
नि डोलू लागते छप्पर...

मुली भरुन टाकतात अंगण
नि वळचणीतले रांजण
मनातल्या स्वप्नांनी-रंगानी
शाश्वत रंगांनाही रंग देण्याचे
कौशल्य असते त्यात
हा सोस नसतो मुलींचा
तर ध्यास असतो नव्या उर्मींचा !

मुली असतात
उन्हाची कातर छाया
लहरती... बहरती कापूर काया
त्या सुखाचा मंद प्रकाश
नि मायेचं झुलतं... धुंद आकाश
त्या विश्वाचा कोवळा हात
जगाची अधाशी तहान
त्या असतात
काळाचे फडफडते.. कोरे
करकरीत पान

म्हणून मुलींना
करु द्यावेत हट्ट
नि होऊ द्यावे स्वछंदी
हीच तर असते
त्यांच्या प्राक्तनात पेटलेल्या
निराजंनातील असोशीची नांदी !

भूख है तो सब्र कर

भूख है तो सब्र कर रोटी नहीं तो क्या हुआ
आजकल दिल्ली में है ज़ेर-ए-बहस ये मुदद्आ ।


मौत ने तो धर दबोचा एक चीते कि तरह
ज़िंदगी ने जब छुआ फ़ासला रखकर छुआ ।


गिड़गिड़ाने का यहां कोई असर होता नही
पेट भरकर गालियां दो, आह भरकर बददुआ ।


क्या वज़ह है प्यास ज्यादा तेज़ लगती है यहाँ
लोग कहते हैं कि पहले इस जगह पर था कुआँ ।


आप दस्ताने पहनकर छू रहे हैं आग को
आप के भी ख़ून का रंग हो गया है साँवला ।


इस अंगीठी तक गली से कुछ हवा आने तो दो
जब तलक खिलते नहीं ये कोयले देंगे धुआँ ।


दोस्त, अपने मुल्क कि किस्मत पे रंजीदा न हो
उनके हाथों में है पिंजरा, उनके पिंजरे में सुआ ।


इस शहर मे वो कोई बारात हो या वारदात
अब किसी भी बात पर खुलती नहीं हैं खिड़कियाँ । 
 ----------------------------------------------------------------------------

(मराठी अनुवाद )
भुख आहे तर दम धर, भाकरी नाही तर काय झाले 
आजकाल हा मुद्दा दिल्लीत मोठा विवादास्पद आहे
मृत्यूने दाढेत धरुन खाली दाबले आहे चित्त्याप्रमाणे 
जीवनाने गोंजारले आहे तेही अंतर राखुन 

 याचना केली तरी येथे काहीच फरक पडत नाही
पोटभर शिव्या दे , मन भरुन शाप दे 


काय कारण असावे येथे तहान फार लागते
लोक म्हणतात येथे कधी तरी विहीर होती

तुम्ही हातमोजे घालुन आगीला धरु पाहत आहात 
तुमच्या पण रक्ताचा रंग काळवंडला आहे 


या शेकोटी पर्यंत गल्लीतील हवा पोहचु द्या 
जो पर्यंत फुलणार नाहीत निखारे, तो पर्यंत हे कोळसे धुर ओकतील 

मित्रा आपल्या देशाच्या नशीबावर नाराज होऊ नको
त्यांच्या हातात आहेत पिंजरा अन् पिंजर्र्यात आहेत पोपट 

या शहरात जेव्हा निघते लग्नाची वरात अथवा दंगा करणारा जमाव
तेव्हा आता कोणत्याच घटनेसाठी या घरांच्या खिडक्या उघडणार नाहीत.

हो गई है पीर पर्वत / दुष्यंत कुमार (मराठी अनुवाद)

मुळ हिंदी कविता 






हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए

आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी

शर्त थी लेकिन कि ये बुनियाद हिलनी चाहिए

हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव में

हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं

मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही

हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए 



-------------------------------------------------------------- 


मराठी अनुवाद 


पर्वता इतकी पीडा उंच झाली आहे, ती आता वितळली पाहिजे  
या हिमालयातुन आता एखादी तरी गंगा निघाली पाहिजे


आज ही भिंत एखाद्या पडद्याप्रमाणे डोलु लागली आहे 
अट हीच होती की हिचा पायाच उध्वस्त केला पाहिजे 


प्रत्येक सडकेवर, गल्लीत, नगरात, गावांत 
हात उंचावत प्रेत चालले पाहिजे 


फक्त हंगामा उभा करणे माझा उद्देश नाही 
माझा संघर्ष आहे की हा चेहरा बदलला पाहिजे 


माझ्या अंतरी नाही तर तुझ्या अंतरी तरी 
जेथे आग असेल तेथे आता ही आग पेटली पाहिजे

देख, दहलीज़ से काई नहीं जाने वाली / दुष्यंत कुमार (मराठी

(मुळ हिंदी कविता )

देख, दहलीज़ से काई नहीं जाने वाली
ये ख़तरनाक सचाई नहीं जाने वाली

कितना अच्छा है कि साँसों की हवा लगती है

आग अब उनसे बुझाई नहीं जाने वाली

एक तालाब-सी भर जाती है हर बारिश में

मैं समझता हूँ ये खाई नहीं जाने वाली

चीख़ निकली तो है होंठों से मगर मद्धम है

बंद कमरों को सुनाई नहीं जाने वाली

तू परेशान है, तू परेशान न हो

इन ख़ुदाओं की ख़ुदाई नहीं जाने वाली

आज सड़कों पे चले आओ तो दिल बहलेगा

चन्द ग़ज़लों से तन्हाई नहीं जाने वाली 

 -----------------------------------------------------------

मराठी अनुवाद 
पहा या उंबरठ्यावरील लाल डाग जाणार नाही 
भयानक वास्तव येथील मिटवले जाणार नाही 

हे तरी किती बरे आहे , आपल्याच श्वासांची झुळुक वहात आहे 
आता ही आग ते मिटवू शकणार नाहीत 
पावसाने एक तळे भरुन जात आहे 
मला वाटते की हा खड्डा आता बुजवला जाणार नाही 

ओठातुन किंकाळी निघाली आहे पण तीही कुजबुज होईल इतकीच 
या बंद घरांना ती ऐकु जाणार नाही 

तू खुपच त्रासला आहेस, त्रासुन जाऊ नको 
या दैवतांची महिमा लगेच संपणार नाही 


आज सडकेवर उतरू या, मनाला दिलासा मिळेल 
काही गजलांनी ही उदासीनता आता संपणार नाही.


मोची ( कवि धूमिल )


हिंदी साहित्यातील सुप्रसिध्द कवि स्व. धूमिल ( सुधाकर पांडे) यांची सुप्रसिध्द कविता मोची या रचनेचा मराठी अनुवाद वाचकां पुढे सादर करीत आहे.
( मुळ नांव- सुदामा पांडेय, उपनाम धूमिल जन्म स्थानखेवली, जिला वाराणसी, उत्तरप्रदेशकुछ
प्रमुख रचना- संसद से सड़क तक (1972), कल सुनना मुझे, सुदामा पाण्डे का प्रजातंत्र (1983)विविध कल सुनना मुझे काव्य संग्रहा करीता 1979 साली साहित्य अकादमी पुरस्कार)


रापी चालवताना
त्‍याने माझ्याकडे क्षणभर वर खाली पाहिले
आणि दयनीय स्‍वरात
तो हसत  म्‍हणाला -
'बाबुजी, खर सांगू - माझ्या नजरेत
कोणी छोटा नाही
कोणी मोठा नाही
माझ्या दृष्‍टीने प्रत्‍येक माणूस एक जोडी चप्‍पल आहे.
जो माझ्या समोर
दुरुस्‍ती करीता उभा आहे.
आणि मुख्‍य गोष्‍ट म्‍हणजे
तो आपल्‍या जागी कोणीही असो.
जसा आहे, ज्‍या ठिकाणी आहे.
आजकाल,  कोणीही व्‍यक्‍ती चपलेच्‍या मापाबाहेर नाही.
तरी सुध्‍दा माझे लक्ष असते की
व्‍यावसायिक हात व फाटलेल्‍या चपलेच्‍या मध्‍ये
कोठे ना कोठे एक साधारण माणुस आहे
ज्‍याच्‍यावर टाके पडतात
जो चपलेच्‍या बाहेर डोकावणा-या अंगठयाची जखम
छातीवर घाव सोसत सहन करतो.
येथे  नानाविध चपला येतात
आणि माणसाला निरनिराळया आपआपल्या  पसंती दाखवतात.
सर्वांचा आप आपला चेहरा आहे.
आपआपली शैली आहे.
उदाहरणार्थ-  एक चप्‍पल आहे
चप्‍पल काय ती एक ठिगळांची थैली आहे
जिला एक चेहरा वापरतो
जो देवीच्‍या व्रणाने भरलेला आहे.
विश्‍वास दर्शक हसण्‍यामध्‍ये
टेलिफोन खांबावर अडकलेली पतंग आहे.
जी फडफड आवाज करीत आहे
बाबुजी या चपलेवर पैसे व्‍यर्थ का उधळता,
मी हे बोलु इच्छितो परंतु
माझ्या आतुन एक आवाज येतो-
काय माण्‍ुस आहे. आपल्‍या जातीवर थुंकतो आहेस,
तुम्‍ही विश्‍वास ठेवा त्‍या क्षणी मी
ठिगळाप्रमाणे मी डोळे शिवुन घेतो
आणि संकटात पडलेल्‍या माणसाची
मोठ्या मुश्‍कीलीने सुटका करतो,
एक चप्‍पल अशी आहे
जी गुंफून एक माणुस निघतो सफरीवर ,
तो हुशार नाही  वेळेचा ताबेदार नाही
त्‍याच्‍या डोळ्यात लालच भरलेली आहे
हातात त्‍याच्‍या घड्याळ आहे
त्‍याला कोठे जायचे नाही परंतु
चेह-यावर त्‍याच्‍या गडबड आहे
तो कोणी व्‍यापारी आहे किंवा दलाल
परंतु उध्‍दट असा कि हिटलरचा नातु आहे
इथे बांध,तिथे काप, इथे ठोक तिथे पिट
चांगले घास,असे चमकवं, चपलेचा आरसा बनवं
ओफ्फ किती उकाडा आहे!
रुमालाने हवा घेत तो हवामानावर संतापतो
सडकेवर येणा-या जाणा-यावर
वानराप्रमाणे टवकारुन पाहतो
यावर कडी म्‍हणजे  घंटाभर काम करुन
मजुरी देताना साफ नाटक करतो
सज्‍जन लोकांना लुटता का ? असे डाफरत तो
काही नाणी फिरकावतो व
पुढे निघून जातो.
अचानक दचकत तो सडकेवर धावतो
आणि मार्गस्‍थ होतो.
व्‍यवसायावर जेव्‍हा घाव पडतो
तेव्‍हा कोठेतरी एक चोर  खिळा
दबा धरुन वेळ मिळताच
अंगठ्यात रुततो.
याचा अर्थ असा नाही की माझा
गैरसमज झालेला आहे.
प्रत्‍येक क्षणी मला असे वाटते की
चप्‍पल व व्‍यवसायाच्‍या दरम्‍यान
कोठेतरी एक साधारण माणुस असतो
ज्‍याच्‍यावर टाके पडतात
जो चपलेच्‍या बाहेर डोकावणा-या बोटाची जखम
छातीवर हातोड्याचे घाव सोसत सहन करतो,
आणि बाबुजी, खरे सत्‍य हेच आहे की
जिवंत राहण्‍यासाठी खरा तर्क नसेल तर
रामनाम विकून या वेश्‍यांची दलाली करुन
रोजीरोटी कमावण्‍यात काहीच फरक नाही
आणि हेच ते ठिकाण आहे जिथे
प्रत्‍येक माणुस आपला धंदा सोडून
गर्दीत उजळणारा हिस्‍सा बनतो
सगळ्या लोकाप्रमाणे
भाषा त्‍याला चावते
मौसम सतावतात
आता तुम्‍ही त्‍या वसंताकडे पहा.-
हा दिवसा धाग्‍याप्रमाणे ताणतो
झाडावरील लाल लाल हजारो पानांच्‍या टोकाला
उन्‍हात शिजवण्‍यासाठी लटकावतो,
खरे सांगतो त्‍या समयी
रापीची मुठ हातात सांभाळणे
फार मुश्‍कील बनते
डोळे कोठे जातात तर हात कोठे तरी चालतो
मन त्रासलेल्‍या बालकाप्रमाणे
कामावर परतण्‍यास इंकार करते
वाटते की चमड्याच्‍या सज्‍जनतेमागे
एखादे जंगल आहे  जो माणसावर
झाडामागून वार करतो
आणि हे धक्‍कादायक नव्‍हे तर विचार
करण्‍या योग्‍य गोष्‍ट आहे,
परंतु जो जीवनाला पुस्‍तकांनी मापतो
जो सत्‍य आणि अनुभवाच्‍या दरम्‍यान
हत्‍येच्‍या क्षणी डरपोक आहे
तो मोठ्या सहजपणे म्‍हणू शकतो
यार तु मोची नव्‍हे तर शायर आहेस
जो विचार करतो की आग
सर्वांना जाळते, सत्‍य सर्वांच्‍या पलीकडे आहे
काही आहेत ज्‍यांना शब्‍द गवसले आहेत.
काही आहेत जे अक्षरांसमोर आंधळे आहेत
ते प्रत्‍येक अन्‍याय चुपचाप सहन करतात
आणि पोटाच्‍या आगीसमोर डरपोक बनतात.
जेव्‍हा मी हे जाणतो की-
"नकाराने व्‍याप्‍त एक आरोळी "
आणि "एक समजुतदार मौन"
दोघांचा मतलब एक आहे
भविष्‍य घडवण्‍यासाठी 'मौन' व 'आरोळी'
आप आपल्‍या जागी एक प्रकारे
आप आपले कर्तव्‍य बजावीत असतात.