MarathiBlogNet

शुक्रवार, 20 जनवरी 2023

भाषा आक्रमण

 "भाषा आक्रमण "


हिंदी भाषाच मुळी परकीय आक्रमणातून जन्माला आली आहे. भारतीय भाषेत अनेक परकीय भाषेतील शब्द समाविष्ट झाले आहेत. कोणत्याही भाषेला अभिजात तेव्हाच मानावे लागेल जेव्हा ती अनेक भाषिक आक्रमणाने नष्ट न होता उलट ती नवे रूप,नवा अवतार,नवा वेग घेऊन मार्ग काढते.

 भाषा अस्पृश्य नसते. भाषा ही संक्रमणातून सरमिसळ होऊन वेगाने पुढे जाणारी मानवीय घटना आहे. भाषेचे अस्तित्व हे कोणत्याही आक्रमणा मुळे किंवा परकीय भाषेमुळे संकटात येत नाही. भाषेचा वापर करणारी समाज रचना जर मोडकळीस आली तर बोल कोणास लावावे ? आपल्या भाषेचा उपयोग आपण दैनंदिन कारभारात करत नाही हे दुर्दैवी गोष्ट आहे.

महाराष्ट्रात सरकारी नोकरीत अधिकारी ते कर्मचारी या सर्व वर्गाला हिंदी चाचणी परीक्षा उत्तीर्ण करने शासकीय आदेशानुसार आवश्यक आहे.

मराठी भाषिक श्रीमती राज्येश्री जयराम यांचा धारावी झोपडपट्टीतील संवाद भाषा हा प्रबंध जरूर वाचा. केंद्रीय भारतीय भाषा संस्थान, म्हैसूर संस्थेने प्रकाशित केला आहे.

🙏

#मराठी

#हिंदी

#भाषा

#आंतर_भारती

राष्ट्र भाषा नावाचा राष्ट्रीय भाषिक गोंधळ

 ‘ राष्ट्रभाषा नावाचा राष्ट्रीय गोंधळ ‘ 


हिंदी ही भारत सरकारच्या राजकीय कामकाजा करीता 'राजभाषा' आहे.हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असा न्यायालयाने निर्णय दिला आहे. भारतीय भाषा परिवारात प्रत्येक भाषेची आपली अस्मिता व महत्व आहे. प्रांतीय राजकारणा मुळे राष्ट्रभाषा या विषयावर राष्ट्रीय भाषिक गोंधळ सहेतुक पसरवला जात आहे. यामुळे मताचे व सत्तेचे हेतू साध्य होत आहेत. भारतीय घटनेत हिंदी ही राजभाषा आहे.अद्याप कोणतीही भारतीय भाषा 'राष्ट्रभाषा' घोषित केलेली नाही.उद्या भविष्यात एक देश,एक ध्वज व एक राष्ट्रभाषा धोरण ठरवले तर कोणती भाषा राष्ट्रभाषा होऊ शकते,या दृष्टीने आपण राष्ट्रभाषा व हिंदी या संकल्पनेचा विचार करूयात.

भाषा विद्वान सी.एम.बी.ब्रान यांच्या व्याखेनुसार -

[१] कोणत्याही देशाची राष्ट्रभाषा निश्चित करण्याकरीता खास चार गुणांचा सामावेश असणे आवश्यक आहे. ते गुण म्हणजे- 1) ती भाषा त्या देशाची प्रादेशिक भाषा अथवा विशिष्ट प्रदेशातील लोकांची भाषा असावी 2) क्षेत्रीय भाषा जी त्या देशातील विशिष्ट क्षेत्रात उत्तर,दक्षिण वगैरे भागातील असावी 3) सर्वसाधारण संपुर्ण देशात बोलली व समजली जाणारी भाषा किंवा जनसमूहाची भाषा 4) केंद्रीय भाषा जी त्या देशातील सरकारी कामकाजाकरीता एक राष्ट्रीय ओळख या नात्याने वापरली जाते. शेवटच्या दोन गुण विशेषांमुळे बहुतेक भाषा या त्या देशाची वास्तविक अथवा कायदेशीर राष्ट्रीय भाषा ठरते. 

महात्मा गांधी यांची व्याख्या

15 ऑगस्‍ट 1947 पूर्वी हिंदीला राष्‍ट्रभाषा म्‍हणूनच संबोधले जात होते. स्‍वातंत्र्य चळवळीत महात्‍मा गांधी यांनी सत्‍य, अहिंसा, खादी, असहकार या बरोबर हिंदी भाषेचा वापर राष्‍ट्रीय भावना संपूर्ण देशात जागृत करण्‍यासाठी केला होता. कलकत्‍ता येथील कांग्रेस अधिवेशनात त्‍यांनी लोकमान्‍य टिळक यांच्‍या इंग्रेजी भाषेबद्दल स्‍तूती केली परंतु त्‍यांनी टिळकांना सल्‍ला दिला की येथून पुढे काग्रेस च्या मंचावर फक्‍त हिंदी भाषेत भाषण दयावे ज्‍यामुळे सर्व सामान्‍य कांग्रेस कार्यकर्ता अधिक सक्रिय होऊ शकेल. 

- महात्मा गांधी हिंदी आंदोलनाचे प्रमुख नेते होते. त्यांची मातृभाषा गुजराती होती. देशाच्या अखंडते करीता व देशाला एक सूत्रात बांधणारी राष्ट्रभाषा हिंदी हीच सर्वश्रेष्ठ भाषा आहे हे त्यांनी सर्वच भारतीयांना पटवुन दिले. 20 आक्टोबंर,1917 रोजी त्यांनी भडोच येथे द्वितीय गुजरात शिक्षण संमेलनात राष्ट्रभाषा संकल्पना मांडली. ते म्हणतात-

- 1. ती भाषा सरकारी नोकरी करीता सहज समजणारी पाहिजे.

- 2. त्या भाषेमुळे भारतातील अंर्तगत धार्मिक,आर्थिक, व राजकिय कामकाज शक्य व्हावे.

- 3. ही भाषा देशातील बहुसंख्य लोक बोलणारी असावी.

- 4. ही भाषा राष्ट्राकरीता सोपी असावी.

- 5. या भाषेचा विचार करताना क्षणिक व तात्पुरता विचार केला जाऊ नये.

- या पंचसूत्राचा विचार करता त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषा का संबोधले हे ध्यानात येऊ शकते.

- -

भारताची राष्ट्रभाषा 

- भारतीय भाषा परिवारात संस्कृतचे स्थान मातेचे तर इतर सर्व भाषेचे स्थान भगिनींचे आहे. यात हिंदी सर्व भारतीय भाषेची मोठी बहिण आहे. भारतीय जनगणना 1991 न्वये हिंदी भाषिकांची संख्या एकूण भारतीय लोकसंख्येच्या 40.20 इतकी आहे. केंद्रीय भारतीय भाषा संस्था म्हैसूर यांच्या आकडेवारीनुसार व जनगणना 1991 मधील सर्वेक्षणानुसार इतर भारतीय भाषेचे टक्केवारी मराठी-7.50, बंगाली-8.30,तेलुगु- 7.90, तमील-6.30, कन्नड-3.90, मल्याळी- 3.60, पंजाबी- 2.80, उडिया- 3.30, गुजराती- 4.90, उर्दू-5.20, असामी-1.40 इतकी आहे. भारतीय घटनेतील आठव्या परिच्छेदात एकूण 22 राष्ट्रीय भाषेचा सामावेश केलेला आहे. याशिवाय इतर 844 वेगवेगळ्या बोली भाषा भारतात अस्तित्वात आहेत. भारतातील हिंदीचे स्थान पाहता ती राष्ट्रभाषा होऊ शकते परंतु काही राज्यात हिंदीला राष्ट्रभाषा घोषित करण्यास विरोध आहे. भाषेच्या राजकारणात देशांची अखंडता धोक्यात येऊ नये या करीता भारताचे पहिले पंतप्रधान स्व.पंडित नेहरु यांनी इंग्रजी भाषेच्या वापरास परवानगी देऊन हिंदीला राजभाषा घोषित केले. राष्ट्रभाषा हा वाद स्वातंत्र्यापासुन विचाराधीन आहे. या करीता सर्वांचे राजकिय ऐक्य विचारात घेतल्यानंतरच राष्ट्रभाषा ठरवता येईल.


'भारत सरकारच्या प्रकाशन विभाग द्वारा प्रकाशित राष्ट्रभाषा से राजभाषा तक पुस्तकातील विचार

भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने डॉ.विमलेश कांती वर्मा द्वारा लिखित हिंदी और उसकी उपभाषाएं पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांनी सरकारी आकडेवारीच्या आधारे हिंदी भाषेचा सर्वेक्षण रिपोर्ट सादर केलेला आहे. द केम्ब्रिज इनसाइक्‍लोपीडिया आफ लैंग्वेज अनुसार प्रथम वीस भाषेत हिंदीचा चौथा क्रमांक तर तसेच लोकसंख्‍ये अनुसार हिंदीचा तिसरा क्रमांक आहे. परंतु यात बिहारी बोलणा-या 6.5 करोड लोकांना जोडले तर मातृभाषा या नात्याने हिंदी जगात तिस-या क्रमांकाची भाषा आहे. भारतात द्विभाषिक स्थिति मुळे अनेक प्रातांत हिंदी ही दूसरी भाषा या नात्‍यांने प्रचारात आहे. महाराष्‍ट्रात मराठी नंतर हिंदी समजणारे 86.17 लोक हिंदीचा उपयोग करतात. भारतीय भाषा परिवारात हिंदी भाषा द्वितीय भाषा म्हणून मोठया प्रमाणात सर्वत्र वापरली जाते. 


14 सप्‍टेंबर 1949 रोजी भारताने केंद्र सरकारच्या सर्व प्रशासकिय कामकाजा करीता हिंदी भाषेचा स्‍वीकार राजभाषा या नात्याने केला आहे. घटनेतील कलम ३४३ न्वये देवनागरी लिपित लिहीली जाणारी हिंदी भाषा राजभाषा आहे. हिंदीच्या संदर्भात १९४८ रोजी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी भारतीय घटना सभेत नॅशनल लैंग्वेज (राष्ट्रभाषा) व स्टेट लैंग्वेज (राजभाषा) शब्दांचा वापर केला. घटना समितीने स्टेट लैंग्वेज करीता हिंदीत राजभाषा हा अनुवाद केला आहे. यावर काही विद्वानांनी विरोध केलेला आहे.स्टेट लैंग्वेज ऐवजी ऑफिशियल लैंग्वेज हा शब्द स्वीकार केला गेला. ऑफिशियल लैंग्वेजचा प्रयोग अर्थात हिंदीचा प्रयोग सरकारी कामकाज,प्रशासन,लोकसभा व राज्यात विधान सभेत व न्याय पालिकेत स्वीकारी गेली आहे.

14 सप्टेबंर,1949 रोजी म्हणजे घटना अस्तित्वात येण्याअगोदरच तत्कालीन प्रबुद्ध राजकिय नेत्यांनी हिंदीचा स्वीकार केला. याच दिवशी भारतीय घटना सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांचे समारोपाचे भाषण झाले. त्यात त्यांनी हिंदी विषयी मार्गदर्शक चिंतन व्यक्त केले आहे. ते म्हणतात की आमच्या देशाच्या इतिहासात आतापर्यंत कधीच एका भाषेला सरकार दरबारी व प्रशासनात मान्यता मिळाली नाही. मला विश्वास आहे कि हिंदी भाषा अन्य भारतीय भाषेतील चांगली ग्राह्य गोष्टी स्वीकारील ज्यामुळे तिची अधोगती नाही तर विकासच होणार आहे. राजभाषा हिंदीच्या लोकसभेतील त्या चर्चेमुळे अनेक प्रांतात फूट पडू शकली असती परंतु तत्कालीन नेत्यांनी संयमाने व अभ्यासपूर्ण भाषणांनी लोकसभा जिंकली. एका केंद्रीय भाषेमुळे आपल्यातील अंतर दूर होईल. आमचे संबंध घनिष्ट होतील कारण आपली परंपरा,संस्कृती व सभ्यता एक आहे.

भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने डॉ.विमलेश कांति वर्मा द्वारा संपादित लोकसभेतील भाषणांच्या संकलीत कागदपत्रांवर आधारीत हिंदी राष्ट्रभाषा से राजभाषा तक प्रकाशित केले आहे.यात सर्वच नेत्यांच्या भाषणांचा वृत्तांत आपणास वाचता येईल.

डॉ.जयंतीप्रसाद नौटियाल यांचे संशोधन

कोलकोता येथील कार्पोरेशन बँकेचे वरिष्ठ अधिकारी डॉ.जयंतीप्रसाद नौटियाल यांनी हिंदी भाषेच्या प्रसारावर संशोधन करुन आपला प्रबंध सादर केलेला आहे. त्यांच्या या प्रबंधात त्यांनी जागतिक आकडेवारीनुसार हे सिध्द केले आहे की हिंदी ही जगातील प्रथम क्रमाकाची भाषा आहे.त्यांनी ही आकडेवारी वर्ड अलमेनिक वरुन घेतली आहे. तसेच विविध देशातील दूतावासातील अनेक वरिष्ठ सचिवांकडून त्यांनी आकडेवारी गोळा केली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार चीन मध्ये अनेक बोली भाषा असुन त्यांचा सामावेश मंदारीन भाषेत केलेला आहे. चीन मध्ये अनेक बोली भाषिक दुसरी बोलीभाषे पासुन अनभिज्ञ आहेत. हिंदी समजणारे जगात एक अरब पेक्षा जास्त लोक आहेत जे जगातल्या अनेक देशात विभागले गेले आहेत. जगातील भाषातज्ञ हिंदीतील खडीबोलीलाच हिंदी भाषा मानतात परंतु हिंदीत अनेक बोली भाषा आहेत. उर्दूचे व्याकरण हिंदी भाषेवर आधारित आहे. ती शुध्द भारतीय भाषा आहे ज्यात काही अरबी फारसी शब्द आहेत. हिंदी जाणणारे कोणीही उर्दू भाषा सहजपणे समजू शकतात. पाकिस्तानात सिंधी,बलुची,अफगाणी या भाषा आहेत परंतु फाळणीत पाकिस्तानात भारतीय मुसलमान आपली भारतीय भाषा उर्दू तिकडे घेउन गेले. उर्दू राजकिय आश्रयामुळे तेथील स्थानिक भाषा नसुन सुध्दा राष्ट्रीय भाषा होऊ शकली.भारतात हिंदी ही द्वितीय किंवा तृतीय भाषेच्या स्वरुपात समजणारे या देशात 80 टक्के लोक आहेत. इंग्रजी लिहिता व बोलू शकणारी जनता अल्प स्वरुपात आहे.जगात इंग्रजीची टक्केवारी 4.85 इतकी आहे..

घटनेतील कलम ३५१

घटनेतील कलम ३५१ अत्यंत महत्वपूर्ण आहे. यात केंद्र सरकारने राजभाषा हिंदी शब्दाचा वापर न करता हिंदी शब्दाचा वापर केला आहे. या कलमात स्पष्ट केले आहे की भारतातील एकजीव संस्कृतीच्या सर्वच अभिव्यक्तींचा माध्यम या नात्याने हिंदीचा विकास करावा. त्या भाषेचा आत्मा न बदलता या भाषेत हिंदुस्तानी (जी भाषा म.गांधी यांना अभिप्रेत होती ज्यात उर्दू व संस्कृत भाषेचा समान वापर केलेला आहे) व घटनेतील आठव्या परिच्छेदातील सर्व भारतीय भाषांच्या ( ज्या आज मितीला २२ आहेत) प्रचलित शब्दांना आत्मसात केले जावे. अन्य भारतीय भाषेचे रुप,शैली,व पदावलीचे अनुकरण करुन मुख्यत संस्कृत व अन्य सर्व भाषेचे ( यात जगातील सर्व प्रचलित भाषा ज्यात इंग्रजी सुध्दा अंतर्भुत असेल) शब्द ग्रहण करुन हिंदी भाषा समृद्ध करावी. यामुळे हे स्पष्ट होते कि भारतात हिंदी ही भाषा कोणत्याही विशेष प्रदेशाची मक्तेदारी नाही. ती जशी महाराष्ट्राची आहे तशी ती तमीळ जनतेचेची सुध्दा आहे.

स्वातंत्र्य पूर्व चळवळीतील मतप्रवाह

स्वातंत्र्य चळवळीत हिंदीचा उल्लेख हा तत्कालीन सर्वच राजकिय नेत्यांनी राष्ट्रभाषा हाच केला . असहकार,खादी सोबत हिंदीचा राष्ट्रभाषा या नात्याने स्वातंत्र्य आंदोलनात उपयोग केला गेला होता. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने वर्धा येथे राष्ट्रभाषा प्रचार समितिची स्थापना केली गेली.

मराठी भाषीक केशव वामन पेठे यांनी 1893 मध्ये ‘राष्ट्रभाषा किंवा सर्व हिन्दुस्थानची एक भाषा करणे’ हे पुस्तक पुणे येथे प्रकाशित केले होते. या पुस्तकात त्यांनी राष्ट्रीय स्तरावर हिंदी ही सर्वस्वीकृत राष्ट्रभाषा असावी असे मत मांडले होते.

 आज वर्धा येथे केंद्र सरकारने जगातील पहिले महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापन केले आहे. या विद्यापीठाचे स्थलातंर काही उत्तरेतील प्राध्यापक वर्ग दिल्ली करणार होते परंतु राष्ट्रभाषा प्रचार समितिच्या प्रयत्ना मुळे ते तहकुब झाले. मा.मधुकर राव चौधरी यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या भूमिवर केंद्र सरकारचा हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभा राहीला आहे. त्यांनी नागपुर येथे पहिले आंतराष्ट्रीय हिंदी सम्मेलन 10 जानेवारी,1975 रोजी आयोजित केल्यामुळे आज जगात सर्वत्र व सर्व दूतावासात 10 जानेवारी हा विश्व हिंदी दिवस पाळला जातो. 14 सप्टेबंर 1949 रोजी राजभाषा हिंदी स्वीकारल्या मुळे केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयात 14 सप्टेबंर हा हिंदी दिवस पाळला जातो. याचे श्रेय सुध्दा वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समितीलाच आहे.

पुणे येथे महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिति स्थापन केली आहे.


युरोपात अनेक देशांची राष्ट्रभाषा संकल्पना अद्याप निश्चित झालेली नाही. अमेरिका जिथे इंग्रजी भाषेचे वर्चस्व आहे तिथे सिनेट मध्ये राष्ट्रभाषा प्रस्ताव लंबीत आहे.तेथील मूळ भूमिपुत्र रेड इंडियन यांचा इंग्रजी राष्ट्रभाषेला विरोध आहे.अमेरिका ही मिश्र संस्कृती आहे. 


आशियातील देशांची राष्ट्रभाषा

आशियातील अनेक देश युरोपातील काही देशांचे गुलाम होते. त्यामुळे आशियातील अनेक देशात तेथील भाषेचे स्थान इंग्रजी,फ्रेंच इत्यादी परकीय भाषे समोर गौण ठरले आहे.


 हिंदी संमेलन,परिसंवाद,कार्यशाळा याकरीता जेव्हा कधी मला उत्तर भारतात जावे लागते तेव्हा तेथील लोक महाराष्ट्राच्या विकासा बध्दल तसेच मराठी लोकांच्या प्रगल्भ राष्ट्रप्रेमा बद्धल प्रशंसा व्यक्त करतात. राष्ट्रभाषा हिंदी प्रचारातील महाराष्ट्राचे योगदान ते मान्य करतात. जाज्वल्य राष्ट्रभक्ती साठी महाराष्ट्रातील विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, महात्मा फुले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, कर्वे यांचा आदराने उल्लेख केला जातो. 1857 चा उठाव असो किंवा 1942 ची चले जाव चळवळ असो या सर्वच राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राचे नांव अग्रभागी आहे. राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचे नांव सर्वच भारतात आदराने घेतले जाते.


हिंदीत रोजगाराच्या अनेक वाटा आहेत, यात अनुवाद, पत्रकारीता, दूरदर्शन,चित्रपट,जाहिरात,विपणन,व्यापार,पर्यटन,धार्मिक संस्था इ. अनेक क्षेत्रात महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. प्रत्येक देशातील राष्ट्रभाषेला इतिहास आहे. गुलामीत राहिल्यानंतरच खुद्द इंग्लंड मध्ये इंग्रजी भाषेला १३ व्या शतकापर्यंत फ्रेंच भाषेशी संघर्ष करावा लागला. राजभाषा हिंदीचा इतिहास तर आता कोठे 71 वर्षाचा झालेला आहे भाषेची लढाई अनेक काळापर्यंत चालणारी आहे. भाषेचे विद्वान सांगतात की आधी मातृभाषेचा आदर करा तेव्हा कोठे तुम्ही राष्ट्रभाषेचा आदर करु शकाल. 

संदर्भ

हिंदी विकिपीडिया

भारतीय भाषा सर्वे भारतीय भाषा संस्थान म्हैसुर भारत सरकार (इंग्रजी संकेतस्थळ)

राष्ट्रभाषा से राजभाषा तक डॉ.विमलेशकांत वर्मा ,(प्रकाशन विभाग,भारत सरकार)


~ विजय नगरकर

अहमदनगर, महाराष्ट्र

vpnagarkar@gmail.com

9422726400

9657774990



शुक्रवार, 25 नवंबर 2022

खेतीहर मजदूर

 डच कविता 'खेतीहर मजदूर' के मेरे अनुवाद को विजय नगरकर जी ने मराठी भाषा में अनूदित किया है।

डच कविता का हिंदी अनुवाद नीचे है। 


शेत मजूर

(De Ploeger) 


मला नको पिकातील दाणा,

रक्षण करण्या नाही 

छप्पर माझ्या डोक्यावर,

माझा काय अधिकार आहे

 माझी संपत्ति तुमचीच आहे ,


माझी संपत्ती फक्त एकच आहे-

तुझ्या शब्दांना मी दिशा देत आहे

प्रवासी आहे तुझ्याच आदेशाचा

नांगर चालवितो तुझ्या

शब्दांचा,


तूच मला ही जबाबदारी दिली आहे

अफाट ही भूमी व उंच पसरलेली शेती

तू विकत घेतली आहे

माझी इच्छा घोड्यासहित,


नजर जाते तेथे 

पाहतो मी समुद्र,

माझे शरीर थकले आहे

दुर्बळ व शांत झाले आहे,


आता इच्छा एकाच आहे

हे शक्तिमान -


हे उपकार सहन करण्यासाठी

जन्म घेतला मी शरद ऋतूत

आणि याच जगात मरणार आहे,


तुम्ही सर्व जाणकार आहात

करून विलाप रडणे व्यर्थ आहे

माझ्या चारी दिशेला 

फेर धरला आहे भूतकाळातील सुखद आठवणीने,

उदासता ही मला टाळीत आहे


आता मी या मातीत मिसळून गेलो आहे

आता मी फुलणाऱ्या कळ्यांना पाहू शकणार नाही

मी फिरून एकदा आशेचे पूल बांधू शकणार नाही


तुम्ही फक्त माझ्या पिकावर विश्वास ठेवा

मी तुमची सेवा करीत राहील

प्रारंभा पासुन अंता पर्यंत,

तुमच्या स्वार्था साठी

तुम्ही मला निवडले आहे.


या भूमीवर एक मनाने नांगर धरणारा

एक सुंदर भूमी निर्माण करण्यासाठी,

 ढळत्या संध्याकाळी

लालीमेत निःसंग प्रेम 

करणे गुन्हा आहे

सरळ धोपट मार्ग सोडून

ही अज्ञात उडी आहे


नम्रपणे झुकलेल्या 

अग्नीत जळणाऱ्या

त्याच्या घरातील

तो एक त्याग दीप आहे

तो एक शेत मजूर आहे.


 मराठी अनुवाद-विजय नगरकर, अहमदनगर,महाराष्ट्र

vpnagarkar@gmail.com

+919422726400


मुळ डच कवि -

आद्रियान रोनाल्ड होल्स्ट


आधारित-

( डच भाषा का हिन्दी अनुवाद : रामा तक्षक )


कविता रूट पर लगी विभिन्न डच कवि /कवयित्रियों की कविताओं को पढ़ने का अवसर मिला। उन्हीं में से एक अन्य कविता का फोटो व उसका हिन्दी में अनुवाद।। 

यह कविता आद्रियान रोनाल्ड होल्स्ट की है। यह कवि अपने मित्र यूप निकोलस के घर नाब्बेन गाँव में मिलने आया करता था। नाब्बेन गाँव कविता रूट का हिस्सा है। 


De ploeger 


खेतीहर मजदूर 


नहीं चाहिए मुझे फसल का अनाज,

रखने को छान छप्पर हैं नहीं मेरे पास,

कुछ अधिकार नहीं है मेरा अपना,

सम्पदा हूँ, मैं तुम्हारी ही।


सम्पत्ति मेरी केवल है एक ही -

दिशाएँ मैं देता रहूँ तुम्हारे शब्दों को।

बनता रहूँ कारवां, तुम्हारी जीभ का। 

हल चलाता रहूँ, तुम्हारे शब्दों का ।


है दायित्व सौंपा है तू ने मुझे,

बीच विस्तृत भूमि और ये ऊंचे खेत, 

खरीद लिया है तूने मेरी इच्छा के घोड़ों के साथ।

जहाँ तक मैं देखता हूँ समुद्र मुझे दिखाई देता है।

हो चुकी है, मेरी थकान शांत और दुर्बल।


चाह मेरी केवल है एक - ताकत।

इस अहसास को सहन करने के लिए कि मैं 

पैदा हुआ था शरद ऋतु में, 

और इसी दुनिया में होगा मेरा मरण। 


आप भले से जानते हैं कि कैसे, 

फफक सुबकने वाले विलाप के रूप में,

मेरे चारों ओर घूमती, 

उस बीती हुई सुंदरता में से, 

उदासी भी मेरा टालमटोल करती है।


अब तो मैं तुममें लगभग 

खो सा गया हूँ - मैं फिर से 

कलियों को नहीं देखूंगा।


न ही आशाओं के पुल कभी बांधूंगा, 


आप केवल मुझे फसल में विश्वास दिलाएं,


ताकि मैं सेवा करता रहूँ - 

शुरू से आखिरी तक।

ताकि मैं यह जान सकूँ

कि आपके उद्देश्य ने मुझे चुना है।


भूमि पर एक मन से हल चलाने वाला बनना,

एक सुंदरता के निर्माण के लिए; 


ढ़लती साँझ की लालिमा सा 

अकेले में प्यार करना खिलाफत है।

वह सही राह चलते, पटरी छोड़ छलांग है। 

  

नम्रतापूर्वक झुके रहना ही  

उसके घर का जलता हुआ,

त्याग की मृत्यु का, 

मंद चिराग, एक खेतिहर मजदूर। 


( डच भाषा का हिन्दी अनुवाद : रामा तक्षक )

खेळत राहते

 आई जेव्हा एकटी असते

 तेव्हा निवांत क्षणी बटनाशी

खेळत राहते


ती बटणे जुन्या कपड्यां पासून वेगळी काढत राहते

जमा करते,

कधी तरी उपयोगी पडतील,


प्रत्येक बटणावर हळुवार हात फिरवते व त्याची रचना न्याहाळीत राहते,


बटणाशी निगडित जुने कपडे

कपड्यांशी निगडित व्यक्ती

आठवत राहते त्यांची नाती

व हरवलेली प्रत्येक व्यक्ती,


विविध रंग,आकार व रचनेची

बटणे

नातीच्या सहाव्या जन्म दिवशी तीने घातलेला गाऊन

 आठवीत राहते

लाल फ्रॉक वर किती सुंदर दिसत होता मोत्यांचा सजावटी बटण


हे बटण त्यांच्या रेशमी शर्टाचा

हे बटण बिट्टूच्या फुल पॅण्ट चे, 


आई ती बटणे वर्तमान पत्रावर

तर कधी ओंजळीत घेते

 तिला आठवतात कधी सागरगोटे तर कधी गोटी, 


लिंबाच्या झाडाच्या खाली

काली मातेचे मंदिर

तिला आठवते तिच्या आईच्या ब्लॉऊज चे बटण

ती सांगत राही

माझ्या म्हातारीच्या डोळ्यांना

काजे बटण सापडतात

तुमचे ते हुक अडकवणे नाही जमत, 


ती कधी बाबूजी यांच्या

खादी शर्टाची बटणे 

शोधीत राहते इथे-तिथे


ती स्वतः चे अस्तित्व विसरून

नात्यांच्या आठवणीत हरवते

या बटणामुळे दिवस कसा जातो,समजत नाही

एकटेपणात बटणे तिला

साथ देतात.


******

मूळ हिंदी कविता-

 अनामिका अनु


मराठी अनुवाद- 

विजय नगरकर

बेकद्रे

 होशियारपुर, पंजाब येथील माझे मित्र डॉ धर्मपाल साहिल हे हिंदी व पंजाबी भाषेतील एक सुप्रसिद्ध लेखक कादंबरीकार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक कथा लघुकथा व कादंबरी लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यात नेहमीच सामाजिक प्रश्नांचा मागोवा घेतलेला दिसतो. ते ज्या ठिकाणी राहतात नोकरी करतात तेथील सामाजिक प्रश्न, लोकांच्या चालीरीती यांचा शोध घेतात. त्यांच्या साहित्यातील आशय संपन्न लोकभाषा मन मोहून घेते.  


 त्यांची ' बेकद्रे ' नावाची संक्षिप्त हिंदी कविता खूपच सामर्थ्य शाली आहे. या छोट्या कवितेत त्यांनी फार मोठा संदेश दिलेला आहे. आपण आपल्या प्रिय पुस्तकावर खूप प्रेम करतो. त्याला जपतो सांभाळतो. परंतु कृतघ्न लोक मात्र त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहतात,पाने उल्टवतात व कपाटात बंद करून टाकतात. हीच उपमा त्यांनी आपल्या घरातील उपवर मुली संदर्भात केली आहे. पुस्तक असो वा मुलगी आपण नेहमीच कृतघ्न लोकांच्या हाती देऊन त्यांचा गळा आवळून हत्या करतो. 


कृतघ्न


मुखपृष्ठ न्याहाळताना

पाने चाळवली जातात

नंतर कपाटात

कैद करतात

किंवा रद्दीत विकली जातात,

पुस्तके अथवा मुली

कृतघ्न लोकांच्या हाती देत

आम्ही नेहमीच त्यांचा 

गळा आवळतो.

****

मूळ हिंदी कविता - 

डॉ धर्मपाल साहिल

मराठी अनुवाद - विजय प्रभाकर नगरकर 


***

मूळ हिंदी कविता


बेकद्रे

*****

जिल्द देखते हैं

पन्ने पलटते हैं

फिर अलमारी में

क़ैद कर देते हैं

या रद्दी में

बेच देते हैं

किताबें हों या बेटियां

बेकद्रे हाथों में देकर

हम उनका

गला घोंट देते हैं.


 -डॉ धर्मपाल साहिल

Dharampal Sahil

चाबी

 जेव्हा युद्ध सुरू होते, विमान,क्षेपणास्त्र बॉम्ब वर्षाव करू लागतात,तेव्हा सामान्य नागरिक घर सोडतो,देश सोडतो. या प्रसंगावर हिंदीच्या वरिष्ठ कवयित्री डॉ रती सक्सेना यांनी एक मार्मिक कविता लिहिली आहे. चाबी या कवितेचा मराठी अनुवाद सादर प्रस्तुत - 


घर सोडून जाताना

त्याने घराची चावी

आपल्या खिशात ठेवली होती,

त्याने दरवाजा बंद आहे 

 का उघडा आहे हे पाहिले नाही,


बंद जरी असता तरी

तिन्ही बाजूने भिंती उध्वस्त होत्या

ते कुलूप घराचे काय रक्षण करणार?


तरी त्याचे मन निश्चिंत होते

त्याच्या घराची चावी

त्याच्या खिशात सुखरूप आहे

जी चावी त्याला अनोळखी देशात भरोसा देत राहील की

त्याचे स्वतःचे एक घर

 या विश्वात आहे,


निराधार जीवनात

जेव्हा भुकेच्या ज्वाळा

त्याला कवेत घेऊन वर उठतील,

तेव्हा त्याला घरच्या खरपूस भाकरीचा गंध जाणवेल,


त्याने फक्त चावी नाही तर

एक संपूर्ण त्याचे विश्व

खिशात ठेवले आहे.


****

मूळ हिंदी कविता - रती सक्सेना

मराठी अनुवाद - विजय नगरकर


*****

मूल हिंदी कविता - 


घर से भागते वक़्त उसने

घर की चाभी अपनी जेब में रख ली

बिना यह देखे कि दरवाजा बन्द है या नहीं

बन्द होता तो भी तीन तरफ ढही दीवारें

घर को क्या पनाह देती


फिर भी उसे सकून था कि

एक चाभी उसकी जेब में है

जो उसके अपने घर की है


जो उसे किसी भी अजनबी जगह पर

यह अहसास कराती रहेगी कि

उसका भी अपना घर है

आड़े वक़्त में जब

उसकी भूख की लपटें

कहीं ऊँची उठ जाएंगी

रोटी की महक से रुबरु कर सकेगी


उसने चाभी नहीं एक दुनिया

रख ली अपने साथ


(चाबी)


#ratisaxena Rati Saxena

ठाकुर का कुंआ मराठी अनुवाद

 मराठी अनुवाद


ओमप्रकाश वाल्‍मीकि हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध कवि,लेखक, सामाजिक विचारवंत। त्यांचे दलित आत्मचरित्र 'जूठन' विशेष प्रसिद्ध।

त्यांच्या गाजलेल्या कवितेचा मराठी अनुवाद सादर प्रस्तुत.


ठाकुर का कुआँ / ओमप्रकाश वाल्‍मीकि


चूल मातीची

माती तलावाची

तलाव पाटलाचा,


भूक भाकरीची

भाकरी बाजरीची

बाजरी शेताची

शेत पाटलाचे,


बैल पाटलाचे

नांगर पाटलाचा

नांगराच्या मुठीवर हात आमचा

पीक पाटलाचे,


विहीर पाटलाची

पाणी पाटलाचे

शेत - जमीनी पाटलाच्या

गल्ली - रस्ते पाटलाचे

तर मग आमचे काय?

गाव ?

शहर ?

देश ?


( सदियों का संताप संग्रह से साभार)


मूल हिंदी कविता - ओमप्रकाश वाल्‍मीकि

मराठी अनुवाद - विजय नगरकर


*******


मूळ हिंदी कविता - 


' ठाकुर का कुआँ '


चूल्‍हा मिट्टी का

मिट्टी तालाब की

तालाब ठाकुर का ।


भूख रोटी की

रोटी बाजरे की

बाजरा खेत का

खेत ठाकुर का ।


बैल ठाकुर का

हल ठाकुर का

हल की मूठ पर हथेली अपनी

फ़सल ठाकुर की ।


कुआँ ठाकुर का

पानी ठाकुर का

खेत-खलिहान ठाकुर के

गली-मुहल्‍ले ठाकुर के


फिर अपना क्‍या ?

गाँव ?

शहर ?

देश ?


~ ओमप्रकाश वाल्‍मीकि


(सदियों का संताप संग्रह से साभार)

(नवम्बर, 1981)

संतोष पद्माकर #अनुवाद