MarathiBlogNet

शुक्रवार, 25 नवंबर 2022

खेळत राहते

 आई जेव्हा एकटी असते

 तेव्हा निवांत क्षणी बटनाशी

खेळत राहते


ती बटणे जुन्या कपड्यां पासून वेगळी काढत राहते

जमा करते,

कधी तरी उपयोगी पडतील,


प्रत्येक बटणावर हळुवार हात फिरवते व त्याची रचना न्याहाळीत राहते,


बटणाशी निगडित जुने कपडे

कपड्यांशी निगडित व्यक्ती

आठवत राहते त्यांची नाती

व हरवलेली प्रत्येक व्यक्ती,


विविध रंग,आकार व रचनेची

बटणे

नातीच्या सहाव्या जन्म दिवशी तीने घातलेला गाऊन

 आठवीत राहते

लाल फ्रॉक वर किती सुंदर दिसत होता मोत्यांचा सजावटी बटण


हे बटण त्यांच्या रेशमी शर्टाचा

हे बटण बिट्टूच्या फुल पॅण्ट चे, 


आई ती बटणे वर्तमान पत्रावर

तर कधी ओंजळीत घेते

 तिला आठवतात कधी सागरगोटे तर कधी गोटी, 


लिंबाच्या झाडाच्या खाली

काली मातेचे मंदिर

तिला आठवते तिच्या आईच्या ब्लॉऊज चे बटण

ती सांगत राही

माझ्या म्हातारीच्या डोळ्यांना

काजे बटण सापडतात

तुमचे ते हुक अडकवणे नाही जमत, 


ती कधी बाबूजी यांच्या

खादी शर्टाची बटणे 

शोधीत राहते इथे-तिथे


ती स्वतः चे अस्तित्व विसरून

नात्यांच्या आठवणीत हरवते

या बटणामुळे दिवस कसा जातो,समजत नाही

एकटेपणात बटणे तिला

साथ देतात.


******

मूळ हिंदी कविता-

 अनामिका अनु


मराठी अनुवाद- 

विजय नगरकर

बेकद्रे

 होशियारपुर, पंजाब येथील माझे मित्र डॉ धर्मपाल साहिल हे हिंदी व पंजाबी भाषेतील एक सुप्रसिद्ध लेखक कादंबरीकार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक कथा लघुकथा व कादंबरी लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यात नेहमीच सामाजिक प्रश्नांचा मागोवा घेतलेला दिसतो. ते ज्या ठिकाणी राहतात नोकरी करतात तेथील सामाजिक प्रश्न, लोकांच्या चालीरीती यांचा शोध घेतात. त्यांच्या साहित्यातील आशय संपन्न लोकभाषा मन मोहून घेते.  


 त्यांची ' बेकद्रे ' नावाची संक्षिप्त हिंदी कविता खूपच सामर्थ्य शाली आहे. या छोट्या कवितेत त्यांनी फार मोठा संदेश दिलेला आहे. आपण आपल्या प्रिय पुस्तकावर खूप प्रेम करतो. त्याला जपतो सांभाळतो. परंतु कृतघ्न लोक मात्र त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहतात,पाने उल्टवतात व कपाटात बंद करून टाकतात. हीच उपमा त्यांनी आपल्या घरातील उपवर मुली संदर्भात केली आहे. पुस्तक असो वा मुलगी आपण नेहमीच कृतघ्न लोकांच्या हाती देऊन त्यांचा गळा आवळून हत्या करतो. 


कृतघ्न


मुखपृष्ठ न्याहाळताना

पाने चाळवली जातात

नंतर कपाटात

कैद करतात

किंवा रद्दीत विकली जातात,

पुस्तके अथवा मुली

कृतघ्न लोकांच्या हाती देत

आम्ही नेहमीच त्यांचा 

गळा आवळतो.

****

मूळ हिंदी कविता - 

डॉ धर्मपाल साहिल

मराठी अनुवाद - विजय प्रभाकर नगरकर 


***

मूळ हिंदी कविता


बेकद्रे

*****

जिल्द देखते हैं

पन्ने पलटते हैं

फिर अलमारी में

क़ैद कर देते हैं

या रद्दी में

बेच देते हैं

किताबें हों या बेटियां

बेकद्रे हाथों में देकर

हम उनका

गला घोंट देते हैं.


 -डॉ धर्मपाल साहिल

Dharampal Sahil

चाबी

 जेव्हा युद्ध सुरू होते, विमान,क्षेपणास्त्र बॉम्ब वर्षाव करू लागतात,तेव्हा सामान्य नागरिक घर सोडतो,देश सोडतो. या प्रसंगावर हिंदीच्या वरिष्ठ कवयित्री डॉ रती सक्सेना यांनी एक मार्मिक कविता लिहिली आहे. चाबी या कवितेचा मराठी अनुवाद सादर प्रस्तुत - 


घर सोडून जाताना

त्याने घराची चावी

आपल्या खिशात ठेवली होती,

त्याने दरवाजा बंद आहे 

 का उघडा आहे हे पाहिले नाही,


बंद जरी असता तरी

तिन्ही बाजूने भिंती उध्वस्त होत्या

ते कुलूप घराचे काय रक्षण करणार?


तरी त्याचे मन निश्चिंत होते

त्याच्या घराची चावी

त्याच्या खिशात सुखरूप आहे

जी चावी त्याला अनोळखी देशात भरोसा देत राहील की

त्याचे स्वतःचे एक घर

 या विश्वात आहे,


निराधार जीवनात

जेव्हा भुकेच्या ज्वाळा

त्याला कवेत घेऊन वर उठतील,

तेव्हा त्याला घरच्या खरपूस भाकरीचा गंध जाणवेल,


त्याने फक्त चावी नाही तर

एक संपूर्ण त्याचे विश्व

खिशात ठेवले आहे.


****

मूळ हिंदी कविता - रती सक्सेना

मराठी अनुवाद - विजय नगरकर


*****

मूल हिंदी कविता - 


घर से भागते वक़्त उसने

घर की चाभी अपनी जेब में रख ली

बिना यह देखे कि दरवाजा बन्द है या नहीं

बन्द होता तो भी तीन तरफ ढही दीवारें

घर को क्या पनाह देती


फिर भी उसे सकून था कि

एक चाभी उसकी जेब में है

जो उसके अपने घर की है


जो उसे किसी भी अजनबी जगह पर

यह अहसास कराती रहेगी कि

उसका भी अपना घर है

आड़े वक़्त में जब

उसकी भूख की लपटें

कहीं ऊँची उठ जाएंगी

रोटी की महक से रुबरु कर सकेगी


उसने चाभी नहीं एक दुनिया

रख ली अपने साथ


(चाबी)


#ratisaxena Rati Saxena

ठाकुर का कुंआ मराठी अनुवाद

 मराठी अनुवाद


ओमप्रकाश वाल्‍मीकि हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध कवि,लेखक, सामाजिक विचारवंत। त्यांचे दलित आत्मचरित्र 'जूठन' विशेष प्रसिद्ध।

त्यांच्या गाजलेल्या कवितेचा मराठी अनुवाद सादर प्रस्तुत.


ठाकुर का कुआँ / ओमप्रकाश वाल्‍मीकि


चूल मातीची

माती तलावाची

तलाव पाटलाचा,


भूक भाकरीची

भाकरी बाजरीची

बाजरी शेताची

शेत पाटलाचे,


बैल पाटलाचे

नांगर पाटलाचा

नांगराच्या मुठीवर हात आमचा

पीक पाटलाचे,


विहीर पाटलाची

पाणी पाटलाचे

शेत - जमीनी पाटलाच्या

गल्ली - रस्ते पाटलाचे

तर मग आमचे काय?

गाव ?

शहर ?

देश ?


( सदियों का संताप संग्रह से साभार)


मूल हिंदी कविता - ओमप्रकाश वाल्‍मीकि

मराठी अनुवाद - विजय नगरकर


*******


मूळ हिंदी कविता - 


' ठाकुर का कुआँ '


चूल्‍हा मिट्टी का

मिट्टी तालाब की

तालाब ठाकुर का ।


भूख रोटी की

रोटी बाजरे की

बाजरा खेत का

खेत ठाकुर का ।


बैल ठाकुर का

हल ठाकुर का

हल की मूठ पर हथेली अपनी

फ़सल ठाकुर की ।


कुआँ ठाकुर का

पानी ठाकुर का

खेत-खलिहान ठाकुर के

गली-मुहल्‍ले ठाकुर के


फिर अपना क्‍या ?

गाँव ?

शहर ?

देश ?


~ ओमप्रकाश वाल्‍मीकि


(सदियों का संताप संग्रह से साभार)

(नवम्बर, 1981)

संतोष पद्माकर #अनुवाद

आलेपाक



काल नारायण माने काका गंज बाजारात भेटले. आवर्जून त्यांच्याकडून आलेपाक वडी खरेदी केली.


 मी त्यांना विचारले

“तुमचा आवाज काढून तुमची आलेपाक वडी दुसरा कोणीतरी प्रोफेसर कॉलनी भिस्तबाग रोड येथे रिक्षा फिरून विकत आहे, तुमचा आवाज त्याने रेकॉर्ड केलेला आहे”


तेव्हा माने काका म्हणाले 

“तो माझाच मुलगा आहे, तो रिक्षातून  आलेपाक वडी विकत असतो “


मी विचारले

“ तुमचा मुलगा आलेपाक वडी रिक्षा फिरून विकतो मग तुम्ही त्याच्या सोबत रिक्षा करून फिरत का नाहीत ?”

 तेव्हा ते म्हणाले “बेटा मला आलेपाल वडीने या शहरात खूप फिरवले आहे.त्यामुळेच मी आज सुद्धा तंदुरुस्त आहे व फिरू शकतो. आज नवीन पिढीला पायी चालणे कुठे आवडते?


काल काका गर्दीत सायकल पासून आलेपाक वाचवत होते आज नवीन तरुण मुलांच्या लाखों किमतीच्या बाईक पासून आले पाक वाचवत संथ पावले टाकीत जीवन पुढे नेत आहेत.


माने काका यांना आता चालणे होत नाही असे दिसते. त्यांची पावले संथ पडत होती. तरीसुद्धा ते आलेपाक वडी नित्यनेमाने विकत आहेत.


पन्नास वर्षांपूर्वी मी आलेपाक वडी घेतली होती. तोच गुलाबी कागद,फक्त आज त्यावर त्यांचे नांव,मोबाईल नंबर प्रिंट केलेला आहे. आयुर्वेदिक आलेपाक वडीत आरोग्य रक्षक लेंडी पिंपळी,लवंग तसेच औसलोचन (म्हणजे काय?) यांचा समावेश आहे. 


माझ्या बालपणी त्यांची “ सर्दीला, पडशाला,पित्ताला आलेपाक “ ही आरोळी लक्ष वेधून घेत होती,आजही तोच आवाज खणखणीत आरोळी मारून आलेपाक विकत आहे.

सोमवार, 30 जुलाई 2018

वाहते ही प्रेम गंगा



जीवन एक आग आहे संघर्षाची

तापत रहा

प्रत्येक आगीच्या लाटेत

सोने बनुन निखरत रहा

लालसर प्रकाश किरणाने

मार्ग उजळीत रहा,


जीवन एक पहाट आहे

प्रत्येक क्षणी चालत रहा

प्रत्येक मनाचे  अंगण

सुंगधाने उजळीत वाहणारी

हवा जीवन आहे,


पाखर्याच्या पंखात

उडण्याचे बऴ देणारे

जीवन हे आकाश आहे

उंचावर झेप घेत रहा,


स्वत:ला  पेटवून 

अंधाराला प्रकाश देत रहा

जीवन ही मेणबत्ती आहे

संथपणे पिघळत जा,

थांबणे ही मरणाची निशानी आहे

जीवन मार्ग आहे

अथक चालत रहा,


थकलेल्या मनाला

आल्हाद देणारी

जीवन ही संध्याकाळ आहे

बिनधास्तपणे एकरुप हो

ह्रद्याच्या भावनेला

पदरात घेउन चालत रहा, 

जीवन प्रेम आहे

कधी  स्वतःला सावर
कधी समर्पण करीत रहा


(मूल हिंदी कविता- प्रेम से बहते रहिए – डॉ अन्नपुर्णा सिसोदिया


मराठी अनुवाद-  विजय नगरकर )


 


वाहत रहा प्रेमाने


वाहत रहा प्रेमाने
जीवन एक आग आहे संघर्षाची
तापत रहा
प्रत्येक आगीच्या लाटेत
सोने बनुन निखरत रहा
लालसर प्रकाश किरणाने
मार्ग उजळीत रहा

जीवन एक पहाट आहे
प्रत्येक क्षणी चालत रहा
प्रत्येक मनाचे  अंगण
सुंगधाने उजळीत वाहणारी
हवा जीवन आहे,

पाखर्याच्या पंखात
उडण्याचे बऴ देणारे
जीवन हे आकाश आहे
उंचावर जात रहा,

स्वत:ला नष्ट करत
अंधाराला प्रकाश देत रहा
जीवन ही मेणबत्ती आहे
संथपणे पिघळत जा,

थांबणे ही मरणाची निशानी आहे
जीवन मार्ग आहे
अथक चालत रहा,

थकलेल्या मनाला
आल्हाद देणारी
जीवन ही संध्याकाळ आहे
बिनधास्तपणे एकरुप हो
ह्रद्याच्या भावनेला
पदरात घेउन चालत रहा
जीवन प्रेम आहे
कधी सावर कधी समर्पण करीत रहा

(मुल हिंदी कविता- प्रेम से बहते रहिए – डॉ अन्नपुर्णा सिसोदिया
मराठी अनुवाद-  विजय नगरकर )