वाहत रहा प्रेमाने
जीवन एक आग आहे
संघर्षाची
तापत रहा
प्रत्येक आगीच्या
लाटेत
सोने बनुन निखरत रहा
लालसर प्रकाश
किरणाने
मार्ग उजळीत रहा
जीवन एक पहाट आहे
प्रत्येक क्षणी चालत
रहा
प्रत्येक मनाचे अंगण
सुंगधाने उजळीत
वाहणारी
हवा जीवन आहे,
पाखर्याच्या पंखात
उडण्याचे बऴ देणारे
जीवन हे आकाश आहे
उंचावर जात रहा,
स्वत:ला नष्ट करत
अंधाराला प्रकाश देत
रहा
जीवन ही मेणबत्ती
आहे
संथपणे पिघळत जा,
थांबणे ही मरणाची
निशानी आहे
जीवन मार्ग आहे
अथक चालत रहा,
थकलेल्या मनाला
आल्हाद देणारी
जीवन ही संध्याकाळ
आहे
बिनधास्तपणे एकरुप
हो
ह्रद्याच्या भावनेला
पदरात घेउन चालत रहा
जीवन प्रेम आहे
कधी सावर कधी समर्पण
करीत रहा
(मुल हिंदी कविता- प्रेम से बहते रहिए – डॉ अन्नपुर्णा
सिसोदिया
मराठी अनुवाद-
विजय नगरकर )
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें