MarathiBlogNet

शुक्रवार, 25 नवंबर 2022

आलेपाक



काल नारायण माने काका गंज बाजारात भेटले. आवर्जून त्यांच्याकडून आलेपाक वडी खरेदी केली.


 मी त्यांना विचारले

“तुमचा आवाज काढून तुमची आलेपाक वडी दुसरा कोणीतरी प्रोफेसर कॉलनी भिस्तबाग रोड येथे रिक्षा फिरून विकत आहे, तुमचा आवाज त्याने रेकॉर्ड केलेला आहे”


तेव्हा माने काका म्हणाले 

“तो माझाच मुलगा आहे, तो रिक्षातून  आलेपाक वडी विकत असतो “


मी विचारले

“ तुमचा मुलगा आलेपाक वडी रिक्षा फिरून विकतो मग तुम्ही त्याच्या सोबत रिक्षा करून फिरत का नाहीत ?”

 तेव्हा ते म्हणाले “बेटा मला आलेपाल वडीने या शहरात खूप फिरवले आहे.त्यामुळेच मी आज सुद्धा तंदुरुस्त आहे व फिरू शकतो. आज नवीन पिढीला पायी चालणे कुठे आवडते?


काल काका गर्दीत सायकल पासून आलेपाक वाचवत होते आज नवीन तरुण मुलांच्या लाखों किमतीच्या बाईक पासून आले पाक वाचवत संथ पावले टाकीत जीवन पुढे नेत आहेत.


माने काका यांना आता चालणे होत नाही असे दिसते. त्यांची पावले संथ पडत होती. तरीसुद्धा ते आलेपाक वडी नित्यनेमाने विकत आहेत.


पन्नास वर्षांपूर्वी मी आलेपाक वडी घेतली होती. तोच गुलाबी कागद,फक्त आज त्यावर त्यांचे नांव,मोबाईल नंबर प्रिंट केलेला आहे. आयुर्वेदिक आलेपाक वडीत आरोग्य रक्षक लेंडी पिंपळी,लवंग तसेच औसलोचन (म्हणजे काय?) यांचा समावेश आहे. 


माझ्या बालपणी त्यांची “ सर्दीला, पडशाला,पित्ताला आलेपाक “ ही आरोळी लक्ष वेधून घेत होती,आजही तोच आवाज खणखणीत आरोळी मारून आलेपाक विकत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें