जेव्हा युद्ध सुरू होते, विमान,क्षेपणास्त्र बॉम्ब वर्षाव करू लागतात,तेव्हा सामान्य नागरिक घर सोडतो,देश सोडतो. या प्रसंगावर हिंदीच्या वरिष्ठ कवयित्री डॉ रती सक्सेना यांनी एक मार्मिक कविता लिहिली आहे. चाबी या कवितेचा मराठी अनुवाद सादर प्रस्तुत -
घर सोडून जाताना
त्याने घराची चावी
आपल्या खिशात ठेवली होती,
त्याने दरवाजा बंद आहे
का उघडा आहे हे पाहिले नाही,
बंद जरी असता तरी
तिन्ही बाजूने भिंती उध्वस्त होत्या
ते कुलूप घराचे काय रक्षण करणार?
तरी त्याचे मन निश्चिंत होते
त्याच्या घराची चावी
त्याच्या खिशात सुखरूप आहे
जी चावी त्याला अनोळखी देशात भरोसा देत राहील की
त्याचे स्वतःचे एक घर
या विश्वात आहे,
निराधार जीवनात
जेव्हा भुकेच्या ज्वाळा
त्याला कवेत घेऊन वर उठतील,
तेव्हा त्याला घरच्या खरपूस भाकरीचा गंध जाणवेल,
त्याने फक्त चावी नाही तर
एक संपूर्ण त्याचे विश्व
खिशात ठेवले आहे.
****
मूळ हिंदी कविता - रती सक्सेना
मराठी अनुवाद - विजय नगरकर
*****
मूल हिंदी कविता -
घर से भागते वक़्त उसने
घर की चाभी अपनी जेब में रख ली
बिना यह देखे कि दरवाजा बन्द है या नहीं
बन्द होता तो भी तीन तरफ ढही दीवारें
घर को क्या पनाह देती
फिर भी उसे सकून था कि
एक चाभी उसकी जेब में है
जो उसके अपने घर की है
जो उसे किसी भी अजनबी जगह पर
यह अहसास कराती रहेगी कि
उसका भी अपना घर है
आड़े वक़्त में जब
उसकी भूख की लपटें
कहीं ऊँची उठ जाएंगी
रोटी की महक से रुबरु कर सकेगी
उसने चाभी नहीं एक दुनिया
रख ली अपने साथ
(चाबी)
#ratisaxena Rati Saxena