MarathiBlogNet

सोमवार, 30 जुलाई 2018

वाहते ही प्रेम गंगा



जीवन एक आग आहे संघर्षाची

तापत रहा

प्रत्येक आगीच्या लाटेत

सोने बनुन निखरत रहा

लालसर प्रकाश किरणाने

मार्ग उजळीत रहा,


जीवन एक पहाट आहे

प्रत्येक क्षणी चालत रहा

प्रत्येक मनाचे  अंगण

सुंगधाने उजळीत वाहणारी

हवा जीवन आहे,


पाखर्याच्या पंखात

उडण्याचे बऴ देणारे

जीवन हे आकाश आहे

उंचावर झेप घेत रहा,


स्वत:ला  पेटवून 

अंधाराला प्रकाश देत रहा

जीवन ही मेणबत्ती आहे

संथपणे पिघळत जा,

थांबणे ही मरणाची निशानी आहे

जीवन मार्ग आहे

अथक चालत रहा,


थकलेल्या मनाला

आल्हाद देणारी

जीवन ही संध्याकाळ आहे

बिनधास्तपणे एकरुप हो

ह्रद्याच्या भावनेला

पदरात घेउन चालत रहा, 

जीवन प्रेम आहे

कधी  स्वतःला सावर
कधी समर्पण करीत रहा


(मूल हिंदी कविता- प्रेम से बहते रहिए – डॉ अन्नपुर्णा सिसोदिया


मराठी अनुवाद-  विजय नगरकर )


 


वाहत रहा प्रेमाने


वाहत रहा प्रेमाने
जीवन एक आग आहे संघर्षाची
तापत रहा
प्रत्येक आगीच्या लाटेत
सोने बनुन निखरत रहा
लालसर प्रकाश किरणाने
मार्ग उजळीत रहा

जीवन एक पहाट आहे
प्रत्येक क्षणी चालत रहा
प्रत्येक मनाचे  अंगण
सुंगधाने उजळीत वाहणारी
हवा जीवन आहे,

पाखर्याच्या पंखात
उडण्याचे बऴ देणारे
जीवन हे आकाश आहे
उंचावर जात रहा,

स्वत:ला नष्ट करत
अंधाराला प्रकाश देत रहा
जीवन ही मेणबत्ती आहे
संथपणे पिघळत जा,

थांबणे ही मरणाची निशानी आहे
जीवन मार्ग आहे
अथक चालत रहा,

थकलेल्या मनाला
आल्हाद देणारी
जीवन ही संध्याकाळ आहे
बिनधास्तपणे एकरुप हो
ह्रद्याच्या भावनेला
पदरात घेउन चालत रहा
जीवन प्रेम आहे
कधी सावर कधी समर्पण करीत रहा

(मुल हिंदी कविता- प्रेम से बहते रहिए – डॉ अन्नपुर्णा सिसोदिया
मराठी अनुवाद-  विजय नगरकर )





गुरुवार, 14 जून 2018

काय मिळाले असते

"काय मिळाले असते ? "

स्त्रीच्या भावनेचा सिटी स्कॅन केला तर
अपमानाच्या असंख्य घटनांचा
धोकादायक साकाळलेला डोह मिळाला असता,
निराशेच्या गंभीर जखमेतील
वाहती वेदना दिसली असती,
अगतिक बैचेनीची आकडेवारी
लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसली असती
ताटातुटीच्या भयाने वाढलेली गती
अनेक रात्र  जागलेल्या आसवांनी
बेफाण पुरात वाहाताना,
कंठात रुतलेले उत्तर दिसले असते
सकारण हारलेले वादविवाद
दयनीय अवस्थेत मिळाले असते
उपेक्षेच्या डंखाचे निशान

त्या मशीनला ऐकू आली असती
कोंडलेल्या  हुंदक्यांची आर्तता
रिक्तपणाचे साचलेले मळभाचे घनदाट आकाश
अगतिक रात्रीच्या बदलेल्या असंख्य कुशी
धोक्याच्या निशानीच्या वर पोहचलेल्या,
प्रेम याचनेचा उच्च स्वर आकाशाला भिडणारा
वेदना लपवून ठेवण्याचा चिंताजनक ग्राफ

सहन केलेले टोमणे व टोचून बोलले स्वर
छिन्न भिन्न स्वप्नांचा एक मोठा पुंजका  मिळाला असता
अनवरत टिकेचे खोल व्रण दिसले असते
भावना शोधणारी मशीन असती तर
सुहास्य मुद्रे मागील
वेदनेचे सत्य समोर आले असते

मुळ हिंदी कविता-  " क्या क्या मिलता "
                           
डॉ मधु चतुर्वेदी,मुम्बई
मराठी अनुवाद-        विजय नगरकर

चि सौ कां

पुस्तकांच्या कपाटात ती सोडुन जाते
कव्हरवर लिहिलेले तीचे नांव
भिंतीवर टांगलेली सुंदर ऑईल पेंटिंग तसबीर
चित्राच्या एका कोपर्यात लिहिलेले तिचे नांव
एका नाजुक जाणीवेच्या अबोल निशानीसह
ती घर सोडुन जाते,
मांडव परतणीच्या क्षणाला
मुलगी मागे वळुन न पाहता
मेहंदी लावलेल्या पावलांनी निरोप घेते,

स्वयंपाक घरातील नव्या फॅशनच्या क्रॉकरी
तिच्या पसंतीची बैठक सज्जा, सोफा
तिच्या कपाटातील ठेवून दिलेली ठेवणीतील कपडे
खरेदी केलेल्या तमाम नव्या वस्तु बॅगेत भरुन
अंगणातल्या तुळशी खाली आपले मन दफन करुन
मुली आपला निरोप घेतात.

भकास या घरात आता आठवतात तिचा निरागस स्पर्ष
पुजेच्या घरातील रांगोळीत बुडालेले तिचे सुंगधी हात
घर आंगण सोडताना साश्रु  नयनांनी
मांडव परतणीच्या क्षणाला
मुलगी मागे वळुन न पाहता
मेहंदी लावलेल्या पावलांनी निरोप घेते,

फोटो अल्बम मधील तीची सुहास्य मुद्रा
धुळीने माखलेले पदक व पुरस्कार चिह्न
ठेवून जाते परसदारी फुललेली झेंडुची फुले
बाहुलीला गुंडाळलेली जुनी पुरानी साडी
उदास खेळण्यात उदास विराणी सोडुन जातात मुली,
मुली निरोप घेतानी मनाला चटका लावुन जातात,
टिव्हीवर तिच्या लग्नाची सीडी पाहताना
तिच्या निरोपाचा क्षण येतो तेव्हा
बाप जागा सोडुन उठुन जातो,

सर्व नखरे एका टोपलीत घेउन
मुली निरोप घेताना मनाला चटका लावून जाते

( मूल हिंदी कविता-  मधु चतुर्वेदी)
मराठी अनुवाद- विजय नगरकर)

बुधवार, 9 मई 2018

काय मिळाले असते ?

"काय मिळाले असते ? "

स्त्रीच्या भावनेचा सिटी स्कॅन केला तर
अपमानाच्या असंख्य घटनांचा
धोकादायक साकाळलेला डोह मिळाला असता,
निराशेच्या गंभीर जखमेतील
वाहती वेदना दिसली असती,
अगतिक बैचेनीची आकडेवारी
लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसली असती
ताटातुटीच्या भयाने वाढलेली गती
अनेक रात्र  जागलेल्या आसवांनी
बेफाण पुरात वाहाताना,
कंठात रुतलेले उत्तर दिसले असते
सकारण हारलेले वादविवाद
दयनीय अवस्थेत मिळाले असते
उपेक्षेच्या डंखाचे निशान

त्या मशीनला ऐकू आली असती
कोंडलेल्या  हुंदक्यांची आर्तता
रिक्तपणाचे साचलेले मळभाचे घनदाट आकाश
अगतिक रात्रीच्या बदलेल्या असंख्य कुशी
धोक्याच्या निशानीच्या वर पोहचलेल्या,
प्रेम याचनेचा उच्च स्वर आकाशाला भिडणारा
वेदना लपवून ठेवण्याचा चिंताजनक ग्राफ

सहन केलेले टोमणे व टोचून बोलले स्वर
छिन्न भिन्न स्वप्नांचा एक मोठा पुंजका  मिळाला असता
अनवरत टिकेचे खोल व्रण दिसले असते
भावना शोधणारी मशीन असती तर
सुहास्य मुद्रे मागील
वेदनेचे सत्य समोर आले असते

मुळ हिंदी कविता-  " क्या क्या मिलता "
                             डॉ मधु चतुर्वेदी,मुम्बई
मराठी अनुवाद-        विजय नगरकर

शनिवार, 16 अप्रैल 2016

हे काही ठीक नाही

कसे सांगावे त्यांना एवढे जळणे चांगले नाही
जे सांगतात माझे चाल चलन ठीक नाही,
खोटयाचे खरे सांगणे कला आहे परंतु
स्वतःचे अपराध झाकण्याची ही कला ठीक नाही,
ज्यांच्या मनात पाप असेल त्यांनी घर सोडु नये
वादळी पावसात मातीची ही काया काढणे ठीक नाही,
खुशाल ही बाग़ या पक्ष्यानी सोडून द्यावी
ज्याना वाटते हा देश आपला ठीक नाही,
प्रत्येक गल्लीत इथे शांतता व सन्नाटा आहे
माझ्या देशात हा अबोला काही ठीक नाही,
जे नेहमीच पेहराव बदलण्याचे शौकीन आहेत
अंतिम समयी सांगू शकत नाहीत की हे कफ़न ठीक नाही।
(हिंदी शायरीचा मी केलेला मराठी अनुवाद)

गुरुवार, 26 जुलाई 2012

भाषाभगिनींमध्ये निर्थक वाद नको

दैनिक लोकसत्ता दि.17-11-2009 मध्ये प्रकाशित माझे पत्र-
‘मराठीतून शपथ : अक्कलशून्य राजकारण’ या पत्रातील विचारांशी मी सहमत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारणाला ग्रहण लागले आहे की काय, असेच या प्रकरणी वाटते. भारताला ‘एक राष्ट्र’ या संकल्पनेपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक राजकीय, साहित्यिक, संत व समाजकारण्यांनी आयुष्य वेचले आहे. म्हणूनच एक राष्ट्र, एक ध्वज, एक राष्ट्रभाषा या तत्त्वाला तडा देण्याचे देशविघातक कृत्य कोणी करू नये.
इतिहासकार वि. का. राजवाडे एका संस्थानिकाकडे संशोधनाकरिता आर्थिक मदत मागण्यासाठी गेले. संस्थानिकाने त्यांची मागणी झिडकारत म्हटले की ‘राज्याकडे साहित्य, इतिहासासाठी खजिना नाही.’ तेव्हा राजवाडे संतापून म्हणाले, ‘जनानखान्यातील बायकांची संख्या कमी करा व लावण्यांवरील दौलतजादा कमी करा. इतिहास वाचाल तर तुमची पुढची पिढी वाचेल.’ आज सर्वच राजकारण्यांनी भारताचा व भारतीय भाषांचा इतिहास वाचण्याची गरज आहे.
भारत सरकारने राजभाषा, संपर्कभाषा, जनभाषा, धर्मभाषा, व्यवहारभाषा हिंदीकरिता काय काय केले आहे ते तपासले पाहिजे. मातृभाषेचा अभिमान सर्वानीच ठेवला पाहिजे. परंतु राष्ट्रउभारणीतले हिंदी भाषेचे योगदान समजून घेतले पाहिजे. हिंदी भाषकांना हाकलून दिल्याने महाराष्ट्रातील समस्या सुटणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांनीही सरदारांशी मराठी व हिंदीतून पत्रव्यवहार केलेला आहे. महाराष्ट्र सरकारनेही मराठीनंतर हिंदीचाच स्वीकार केलेला आहे. मराठी संतांनी भारतभ्रमण करून धार्मिक विचार हिंदीतून प्रसारित केले होते.