MarathiBlogNet

गुरुवार, 14 जून 2018

काय मिळाले असते

"काय मिळाले असते ? "

स्त्रीच्या भावनेचा सिटी स्कॅन केला तर
अपमानाच्या असंख्य घटनांचा
धोकादायक साकाळलेला डोह मिळाला असता,
निराशेच्या गंभीर जखमेतील
वाहती वेदना दिसली असती,
अगतिक बैचेनीची आकडेवारी
लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसली असती
ताटातुटीच्या भयाने वाढलेली गती
अनेक रात्र  जागलेल्या आसवांनी
बेफाण पुरात वाहाताना,
कंठात रुतलेले उत्तर दिसले असते
सकारण हारलेले वादविवाद
दयनीय अवस्थेत मिळाले असते
उपेक्षेच्या डंखाचे निशान

त्या मशीनला ऐकू आली असती
कोंडलेल्या  हुंदक्यांची आर्तता
रिक्तपणाचे साचलेले मळभाचे घनदाट आकाश
अगतिक रात्रीच्या बदलेल्या असंख्य कुशी
धोक्याच्या निशानीच्या वर पोहचलेल्या,
प्रेम याचनेचा उच्च स्वर आकाशाला भिडणारा
वेदना लपवून ठेवण्याचा चिंताजनक ग्राफ

सहन केलेले टोमणे व टोचून बोलले स्वर
छिन्न भिन्न स्वप्नांचा एक मोठा पुंजका  मिळाला असता
अनवरत टिकेचे खोल व्रण दिसले असते
भावना शोधणारी मशीन असती तर
सुहास्य मुद्रे मागील
वेदनेचे सत्य समोर आले असते

मुळ हिंदी कविता-  " क्या क्या मिलता "
                           
डॉ मधु चतुर्वेदी,मुम्बई
मराठी अनुवाद-        विजय नगरकर

चि सौ कां

पुस्तकांच्या कपाटात ती सोडुन जाते
कव्हरवर लिहिलेले तीचे नांव
भिंतीवर टांगलेली सुंदर ऑईल पेंटिंग तसबीर
चित्राच्या एका कोपर्यात लिहिलेले तिचे नांव
एका नाजुक जाणीवेच्या अबोल निशानीसह
ती घर सोडुन जाते,
मांडव परतणीच्या क्षणाला
मुलगी मागे वळुन न पाहता
मेहंदी लावलेल्या पावलांनी निरोप घेते,

स्वयंपाक घरातील नव्या फॅशनच्या क्रॉकरी
तिच्या पसंतीची बैठक सज्जा, सोफा
तिच्या कपाटातील ठेवून दिलेली ठेवणीतील कपडे
खरेदी केलेल्या तमाम नव्या वस्तु बॅगेत भरुन
अंगणातल्या तुळशी खाली आपले मन दफन करुन
मुली आपला निरोप घेतात.

भकास या घरात आता आठवतात तिचा निरागस स्पर्ष
पुजेच्या घरातील रांगोळीत बुडालेले तिचे सुंगधी हात
घर आंगण सोडताना साश्रु  नयनांनी
मांडव परतणीच्या क्षणाला
मुलगी मागे वळुन न पाहता
मेहंदी लावलेल्या पावलांनी निरोप घेते,

फोटो अल्बम मधील तीची सुहास्य मुद्रा
धुळीने माखलेले पदक व पुरस्कार चिह्न
ठेवून जाते परसदारी फुललेली झेंडुची फुले
बाहुलीला गुंडाळलेली जुनी पुरानी साडी
उदास खेळण्यात उदास विराणी सोडुन जातात मुली,
मुली निरोप घेतानी मनाला चटका लावुन जातात,
टिव्हीवर तिच्या लग्नाची सीडी पाहताना
तिच्या निरोपाचा क्षण येतो तेव्हा
बाप जागा सोडुन उठुन जातो,

सर्व नखरे एका टोपलीत घेउन
मुली निरोप घेताना मनाला चटका लावून जाते

( मूल हिंदी कविता-  मधु चतुर्वेदी)
मराठी अनुवाद- विजय नगरकर)

बुधवार, 9 मई 2018

काय मिळाले असते ?

"काय मिळाले असते ? "

स्त्रीच्या भावनेचा सिटी स्कॅन केला तर
अपमानाच्या असंख्य घटनांचा
धोकादायक साकाळलेला डोह मिळाला असता,
निराशेच्या गंभीर जखमेतील
वाहती वेदना दिसली असती,
अगतिक बैचेनीची आकडेवारी
लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसली असती
ताटातुटीच्या भयाने वाढलेली गती
अनेक रात्र  जागलेल्या आसवांनी
बेफाण पुरात वाहाताना,
कंठात रुतलेले उत्तर दिसले असते
सकारण हारलेले वादविवाद
दयनीय अवस्थेत मिळाले असते
उपेक्षेच्या डंखाचे निशान

त्या मशीनला ऐकू आली असती
कोंडलेल्या  हुंदक्यांची आर्तता
रिक्तपणाचे साचलेले मळभाचे घनदाट आकाश
अगतिक रात्रीच्या बदलेल्या असंख्य कुशी
धोक्याच्या निशानीच्या वर पोहचलेल्या,
प्रेम याचनेचा उच्च स्वर आकाशाला भिडणारा
वेदना लपवून ठेवण्याचा चिंताजनक ग्राफ

सहन केलेले टोमणे व टोचून बोलले स्वर
छिन्न भिन्न स्वप्नांचा एक मोठा पुंजका  मिळाला असता
अनवरत टिकेचे खोल व्रण दिसले असते
भावना शोधणारी मशीन असती तर
सुहास्य मुद्रे मागील
वेदनेचे सत्य समोर आले असते

मुळ हिंदी कविता-  " क्या क्या मिलता "
                             डॉ मधु चतुर्वेदी,मुम्बई
मराठी अनुवाद-        विजय नगरकर

शनिवार, 16 अप्रैल 2016

हे काही ठीक नाही

कसे सांगावे त्यांना एवढे जळणे चांगले नाही
जे सांगतात माझे चाल चलन ठीक नाही,
खोटयाचे खरे सांगणे कला आहे परंतु
स्वतःचे अपराध झाकण्याची ही कला ठीक नाही,
ज्यांच्या मनात पाप असेल त्यांनी घर सोडु नये
वादळी पावसात मातीची ही काया काढणे ठीक नाही,
खुशाल ही बाग़ या पक्ष्यानी सोडून द्यावी
ज्याना वाटते हा देश आपला ठीक नाही,
प्रत्येक गल्लीत इथे शांतता व सन्नाटा आहे
माझ्या देशात हा अबोला काही ठीक नाही,
जे नेहमीच पेहराव बदलण्याचे शौकीन आहेत
अंतिम समयी सांगू शकत नाहीत की हे कफ़न ठीक नाही।
(हिंदी शायरीचा मी केलेला मराठी अनुवाद)

गुरुवार, 26 जुलाई 2012

भाषाभगिनींमध्ये निर्थक वाद नको

दैनिक लोकसत्ता दि.17-11-2009 मध्ये प्रकाशित माझे पत्र-
‘मराठीतून शपथ : अक्कलशून्य राजकारण’ या पत्रातील विचारांशी मी सहमत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारणाला ग्रहण लागले आहे की काय, असेच या प्रकरणी वाटते. भारताला ‘एक राष्ट्र’ या संकल्पनेपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक राजकीय, साहित्यिक, संत व समाजकारण्यांनी आयुष्य वेचले आहे. म्हणूनच एक राष्ट्र, एक ध्वज, एक राष्ट्रभाषा या तत्त्वाला तडा देण्याचे देशविघातक कृत्य कोणी करू नये.
इतिहासकार वि. का. राजवाडे एका संस्थानिकाकडे संशोधनाकरिता आर्थिक मदत मागण्यासाठी गेले. संस्थानिकाने त्यांची मागणी झिडकारत म्हटले की ‘राज्याकडे साहित्य, इतिहासासाठी खजिना नाही.’ तेव्हा राजवाडे संतापून म्हणाले, ‘जनानखान्यातील बायकांची संख्या कमी करा व लावण्यांवरील दौलतजादा कमी करा. इतिहास वाचाल तर तुमची पुढची पिढी वाचेल.’ आज सर्वच राजकारण्यांनी भारताचा व भारतीय भाषांचा इतिहास वाचण्याची गरज आहे.
भारत सरकारने राजभाषा, संपर्कभाषा, जनभाषा, धर्मभाषा, व्यवहारभाषा हिंदीकरिता काय काय केले आहे ते तपासले पाहिजे. मातृभाषेचा अभिमान सर्वानीच ठेवला पाहिजे. परंतु राष्ट्रउभारणीतले हिंदी भाषेचे योगदान समजून घेतले पाहिजे. हिंदी भाषकांना हाकलून दिल्याने महाराष्ट्रातील समस्या सुटणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांनीही सरदारांशी मराठी व हिंदीतून पत्रव्यवहार केलेला आहे. महाराष्ट्र सरकारनेही मराठीनंतर हिंदीचाच स्वीकार केलेला आहे. मराठी संतांनी भारतभ्रमण करून धार्मिक विचार हिंदीतून प्रसारित केले होते.

पहला गिरमिटिया









दक्षिण अफ्रिकेतील महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक कांदबरी पहला गिरमिटिया सुप्रसिद हिंदी साहित्यकार श्री गिरिराज किशोर यांनी लिहिली आहे. ऐतिहासिक कांदबरी लिहिताना भूतकाळातील घटना, प्रसंग, वास्तु, शहर, देश व तत्कालीन सामाजिक स्थितीचा अभ्यास करावा लागतो. या साठी लेखकाने दक्षिण अफ्रिकेचा दौरा केला आहे. दक्षिण अफ्रिकेतील महात्मा गांधीच्या आठवणीवर आधारित ही एक सामाजिक राजकीय कांदबरी आहे. कांदबरीच्या सुरुवातीला अपर्ण पत्रिकेत लेखकाने च् त्या भारतीयांना व त्यांच्या संततीला जे 19 व्या शतकामये दूर परदेशात गिरमिटिया व यात्रीच्या रुपाने समृदिचा पूल बनले, जे पुन्हा काधीच परतले नाहीत त्या भारतीयांना ज्यांना समुद्राने गिळंकृत केले आणि त्यांच्या संततीला जे समुद्राच्या लाटावर आमरण जीवंत राहिले, येणा-या काळात वाढणा-या माझ्या नातवाला च्तन्मय छ व नातीला च् वान्या छ ज्यांना मोहनदास समजून घेणे कदाचित अत्यंत जरुरीचे आहे. मोहनदास च्या रुपात जो आपल्या देशाकरीता, लोकांकरीत व स्वातंत्र्याकरीता, परक्या भूमिवर झटला आणि महात्मा गांधीच्या रुपाने आपलाच भूमीवर गोळी
झेलून राम-राम म्हणत कायमचा निघून गेला.
19 व्या शतकात इंग्रजांनी दक्षिण अफ्रिकेतील वसाहतीत हिंदुस्तान माधील मजूरांची फार मोठया प्रमाणात करारावर आयात केली. उत्तर भारतीय अडाणी ग्रामीण मजुर तत्कालीन एग्रीमेंट या शब्दाचा उच्चार गिरमिट असा करीत. त्यामुळे एग्रीमेंट वर परदेशात गेलेल्या मजुराला गिरमिटिया संबोधले जाउ लागले. महात्मा गांधी सुदा दक्षिण अफ्रिकेत डर्बन येथे नोकरीसाठी सेठ दादा अब्दुल्ला यांच्याकडे कराराने गेले होते. त्यामुळे ते सुदा गिरमिटियाच होते.
गो-या लोकांनी जगावर राज्य केले. अनेक वसाहती निमार्ण केल्या. अमेरिकेतील काळया लोकांचे 17 व्या शतकात त्यांनी हकालपट्टी केली. काही काळे लोग दक्षिण अफ्रिकेत स्थलांतरित झाले. जुलू ,स्वानिज, बुशेआनाज, भाषिकांचे विभिन्न कबिले निर्माण झाले. त्यांना गोरे लोक नेटीव समजू लागले. 19 व्या शतकात गो-या लोकांचे दक्षिण अफ्रिकेवर राज्य स्थापन झाले . एक लाख गोरे , 5 लाख काळया नेटिव लोकांवर राज्य करु लागले. स्थानिक नेटिव काळे लोक आळशी व अकुशल होते. गो-या लोकांना व्यापारी पिकांच्या मशागती साठी हिंदुस्तान माून कुशल व कष्टाळू भारतीय मजूरांची नितांत आवश्यकता भासू लागली. त्यासाठी त्यांनी हिंदुस्तानातुन करारावर मजूर आयात करण्यासाठी इंग्लैंड मधील गव्हर्नर कडे मागणी केली. या करारामुळे गिरमिटिया मजूरांचे तांडे दक्षिण अफ्रिकेच्या तीरावर धडकू लागले. आरोग्य विभागाचे प्रमाण-पत्र मिळाल्या शिवाय या मजूरांना दक्षिण अफ्रिकेच्या भूमिवर फिरण्यास बंदी होती. त्यामुळे दूरचा प्रवास करुन आलेल्या भारतीय मजूरांचे अतिशय हाल झाले. गोरे लोक या भारतीय मजूरांना रेल्वे, शेती, हॉटेल व घर कामासाठी ठेवू लागले. मजूरांची निवड करताना गाय, म्हैस, घोडे यांच्या निवडी प्रमाणे परीक्षण होऊ लागले. एखादया मजूराला ग्राउंडवर न थांबता पळविले जात असे. मजूरांचे दंड, स्नायु, मांडया तपासून नंतरच मजूरी ठरली जाऊ लागे. अंगात ताप असताना सुदा काम केले तरच मजूरी मिळत असे. या भारतीय मजूरांना मतदानाचा हक्क नव्हता. महात्मा गंधधी वयाच्या 24 व्या वर्षी नेटाल येथे दादा अब्दुल्ला अँड कंपनीत एका वर्षाकरीता 24 मई 1893 रोजी नियूक्त झाले. लंडन येथून बॅरिस्टर पदवी प्राप्त झाल्यानंतर दक्षिण अफ्रिकेतील डर्बन येथे कोर्टरुम पाहिण्यासाठी गांधी गेले होते. गो-या न्यायाधीशांने त्यांना गुजराती पगडी डोक्यावरुन खाली उतरवून घेण्याची आज्ञा केली. भारतीय संस्कृति व परंपरेनुसार पगडी उतरवणे अपमानास्पद समजले जाई त्यामुळे महात्मा गांधी यांनी न्यायाधीशांची आज्ञा ठोकरुन कोर्टा बाहेर जाणे पसंत केले. या विषयी त्यांनी स्थानिक वतर्मानपत्रात निवेदन लिहिले. प्रिटोरियाला जाताना पिटर मेरिटस बर्ग रेल्वे स्टेशन वर त्र्ॅरू]हृõ क्लास डब्यात शिरताना गांधीना गो-या लोकांनी सामानासहित प्लेटफॉर्मवर फेकून दिले. त्याकाळी काळया लोकांनी फस्ट क्लास मये प्रवास करणे अपराध समजला जाई . प्रेसिडेंट क्रूगर यांच्या महालासमोरील फूटपाथ वर चालताना पाहून तेथील पोलिसांनी पकडून महात्मा गांधी यांना झोडपले. अशा अनेक प्रसंगातून महात्मा गांधी यांचा पदोपदी अपमान व अवहेलना झेलावी लागली. त्यांच्या मनात भारतीय बांधवासाठी करुणा निर्माण झाली. तेथील भारतीय मजूरांच्या हक्कासाठी त्यांनी कायदेशीर लढाई शुरु केली. या करीता नेटाल , ट्रांसवाल, डरबन, पीटर, मेरिट्जबर्ग , जोहान्सबर्ग , प्रिटोरिया अशा अनेक ठिकाणी भारतीय मजूरांना संघटित केले. महात्मा गांधी यांच्या या चळवळीमुळे भारतीय मजूर जात, धर्म , भाषा विसरुन केवळ भारतीय या नात्याने एकत्र येऊ लागले.
भारतीय ज्ञानपीठ नवी दिल्ली यांनी लोकोदय ग्रंथमाले अंतर्गत ही 904 पृष्ठांची भव्य कांदबरी 1999 रोजी प्रकाशित केली आहे. लेखकाने ही कांदबरी प्रकाशित करताना आलेल्या आर्थिक व राजकीय अडथळयांचे वर्णन आपल्या भूमिकेत केले आहे. त्यांचा विशेष राग भाजपा व काँग्रेस वर आहे. समाजवादी पक्षाचे श्री मुलायमसिंग यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले आहेत. इलेक्ट्रॉनिक मिडियेतील नयन-कर्ण सुखाच्या निद्रेत ही हजार पृष्ठांची कांदबरी व ती सुदा महात्मा गांधीवर आधारित कोणी वाचक संपूर्ण वाचून काढेल अशी लेखकालाच खात्री नाही त्यामुळे त्यांनी संपूर्ण कांदबरी वाचणा-या पाठकांच्या प्रतिक्रिया अवश्य मागतिल्या आहेत.
पुणे विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर नामित सदस्य या नात्याने 2001साली एका बौठकीत ही कादंबरी मी बोर्डापुढे ठेवली. त्यावेळी काही प्रायापकांनी कांदबरी खुपच मोठी आहे हा बहाना केला. विद्याथ्र्यांना डोईजड होईल असाही युक्तिवाद केला गेला. परंतु महात्मा गांधी यांच्या आफ्रिकेतील जीवनावर हिंदी साहित्यात एवढा विस्तृत रुपात कोणीही लिहिलेले नाही. महात्मा गंधधी यांच्या या संघर्षाची कहानी नव्या पिढीला करुन देणे महत्वाचे वाटले. या कादंबरीत महात्मा गांधी यांनी दक्षिण अफ्रिकेत प्रथमत: सुरु केलेल्या सत्याग्रह आंदोलनाचे वर्णन केलेले आहे. या आंदोलनात हिंदु-मुस्लिम व अन्य धर्माचे भारतीय एकजुट झाले. महात्मा गांधी यांच्या संघर्षाची ही कहाणी आजच्या नवीन पिढी समोर आली पाहिजे. हिंदी अभ्यास मंडळाचे तत्कालीन अयक्ष डॉ. शहाबुद्दीन शेख यांनी माझा प्रस्ताव स्वीकृत केला. डॉ.गिरिराज किशोर यांना पत्राने मी ही गोष्ट कळवली तेव्हा त्यांना फारच आनंद झाला. या कांदबरीची भुमिका मी मराठीत भाषातंरीत करुन सा.साधनात प्रकाशित केली व त्यांना कळवले तेव्हा त्यांनी साने गुरुजी यांनी सुरु केलेल्या साप्ताहिकात त्यांच्या कांदबरीची भुमिका मराठीत आल्या बद्दल आभाराचे पत्र पाठवले. यामुळे पुण्याचे सेवा निवृत्त हिंदी प्रायापक डॉ.पांडुरंग कापडणीस यांनी ही कांदबरी संपुर्णपणे मराठीत भाषातंरित केली आहे व लवकरच ती प्रकाशित होणार आहे.
महात्मा गांधी यांच्या विषयी अनेक भ्रम व दंतकथा पसरलेल्या आहेत. त्यामुळे ऐतिहासिक कागदपत्रांचा आढावा घेऊन लेखकाने दक्षिण अफ्रिकेचा प्रवास केला आहे. मोहनदास गांधी हा एक अत्यंत सामान्य व्यक्ती होता परंतु दक्षिण अफ्रिकेतील अपमान, अवहेलना झेलून महात्मा गांधी यांच्या व्यक्तीमतवाला महात्मा ही पदवी का प्रदान झाली हे समजते. दक्षिण अफ्रिकेतील गांधी साहित्याचे अभ्यासक श्री हासिम-सीदात म्हणतात की च् मला या गोष्टीचा सर्वात मोठा गर्व आहे की जगातील सर्वात मोठा व किंमती हिरा दक्षिण अफ्रिकेतील खाणीत आम्हाला सापडला पंरतु गांधी नावाचा पाणीदार हिरा े आम्ही तुम्हा भारतीयांना दान दिला.छ श्री हासिम-सीदात डरबन येथे वरिष्ठ अॅटरनी व लॉ सोसयटीचे पहिले अफ्रिकन भारतीय पदाधिकारी आहेत.
लेखक आपल्या भुमिकेत लिहितात की दक्षिण अफ्रिकेचा प्रवास केल्यानंतर असे जाणवले की आपण मोहनदास पक्षावर व त्यातल्या त्यात दक्षिण आफ्रिकेतील म. गांधीवरच कादंबरी लिहिली पाहिजे. दक्षिण आफ्रिका महात्मा गांधी यांच्या स्मृतीने वेढलेली आढळली. महात्मा गांधी हे स्वातंत्र्य संघर्षातील संघर्ष-पुरुष होते, यात मुळीच संशय नाही. परंतु मोहनदास हा एक सर्वसामान्य माणसाच्या संवेदना व अनुभव यांच्या सर्वात जवळचा दुवा आहे. आगामी पिढीला मोहनदासाची जास्त गरज आहे, कारण त्यामुळे तिला समजेल की मोहनदास महात्मा गांधी कसा बनला. गांधी एक नौतिक-पुरुष असून ते समाजपुरुषसुदा आहेत, जे आपली कमजोरी कोठेही लपवत नाहीत. आपल्या चुकांची जाणीव, मोठे होण्याचे द्वार असते. या सर्व भटकंतीतून मला साक्षात्कार झाला की काही लिहिण्यापूर्वी संबंधित स्थळ, शहर, सडक या सर्वांना पाहणे किती आवश्यक ठरते. यातूनच प्रचंड रचना आकारास येत असते. नवीन विश्वाची निर्मिती करता येते. मोहनदासचा हा सर्व संघर्ष एका पराधीन भूमीवर कोणा अज्ञात सामान्य माणसासाठी केलेला संघर्ष होता. प्रत्येक विस्थापित व्यक्तीला संघर्ष हा करावा लागतोच, मग भले तो आपल्या देशातील असो अथवा परदेशातील. देशकालानुरुप यामये तीव्रता व गुणात्मक फरक असू शकतो. प्रत्येकजण आपल्या जीवनात र्निधारित, अर्निधारित अथवा अल्प र्निधारित लक्ष्याकडे वाटचाल करीत असतो. त्याकरिता तो त्याग करतो. यातना सहन करतो व काही स्वप्ने पाहतो. मोहनदासाचा उद्देश र्निधारित संघर्ष नव्हता. मी तर म्हणेन की काफिला पुढे जात राहिला व मुक्कामाचे ठिकाण स्पष्ट होत गेले. महात्मा बनण्याचा त्यांचा मार्ग हा अशाच अनिश्चित त्याग, संघर्ष, पीडा, अपमान या अरुंद वाटांतूनच पार होत गेला. महात्मा बनणे ही आंतरिक विकासाची शेवटची पायरी आहे. ही बाब सर्वच ठिकाणी लागू होते. एक महात्मा जेथे खुले पुस्तक आहे, तेथे ती एक अज्ञात पोथीसुदा आहे. खरे पाहता प्रयत्न व संघर्ष यातूनच कथा निर्माण हेधत असते . उपलबीचे शिखर दुरुन डोळयांना दिसते परंतु कथा ही नेहमी संघर्षाची असते.
श्री शौलेश मटियानी आजारी आहेत परंतु स्वस्थ होते तेव्हा म्हणायचे ... च् गिरिराजजी , गांधीची काठी लागली पाहिजे एकदा का तिचा स्पर्श झाला की कादंबरी लगेच पूर्ण होईल! छ
ही कांदबरी नव्या पिढीने जरुर वाचली पाहिजे म्हणजे त्यांना कळेल की दक्षिण आफ्रिकेतील गांधीगिरी काय होती.



पहला गिरमिटिया लेखक - डॉ. गिरिराज किशोर

प्रकाशक-
भारतीय ज्ञानपीठ
18 इन्स्टीटयूशनल एरिया
लोधी रोड, नवी दिल्ली - 110003
मुल्य - रु. 350/-
पहला गिरमिटिया

गिरिराज किशोर
पृष्ठ : 904
आईएसबीएन : 81-263-0760-9
प्रकाशित : अप्रैल २४, २००४

मराठी पाट्यासाठी केंद्र सरकारचे आदेश

गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राजभाषा विभागाने केंद्र सरकारी कार्यालया मध्ये प्रांतीय भाषेत अर्थात महाराष्ट्रातील सर्व कार्यालयात मराठीत पाट्या, सूचना फलक,ग्राहकांसाठी मराठी नमुन्यातील फॉर्म आदि सेवा देण्या बध्दल आदेश जारी केलेले आहेत.
राजभाषा विभागाच्या पत्र संख्या 14034/34/97-रा.भा. दिनांक 04-01-2002 नुसार स्थानिक जनतेच्या सुविधेकरीता केंद्र सरकारी कार्यालयात सर्व प्रकारचे फॉर्म, नोटीस बोर्ड, सूचना, विभागीय साहित्य आम जनतेच्या हितासाठी हिंदी,इंग्रजी बरोबर मराठीत सुध्दा उपलब्ध करुन देण्याचे धोरण ठरवून दिलेले आहे. यामागे केंद्र सरकारच्या त्रिभाषा सुत्राचा आधार आहे. काही विशिष्ट फॉर्म जे सरकारी कार्यालयातील अंतर्गत कामकाजासाठी आवश्यक आहे असे फॉर्म फक्त हिंदी व इंग्रजीत भरले जातील कारण केंद्र सरकारची राजभाषा हिंदी असून इंग्रजी ही सह राजभाषा आहे.
जनतेच्या उपयोगासाठी असणारे सर्व फॉर्म , सूचना,नोटिस बोर्ड यात क्रमानुसार मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेचा वापर करण्याची सक्ती आहे. परंतु हा नियमाची नेहमीच अवहेलना केली जाते. सर्वच सरकारी कार्यालयात ब्रिटीश राजसत्तेची इंग्रजी हीच भाषा प्रयोगात आणली जाते. केंद्र सरकार एका बाजुला त्रिभाषा सूत्राचा पाठपुरावा करीत आहे व सर्वच भारतीय भाषांचा विकास करण्यास कृतसंकल्प आहे. परंतु आज स्वतंत्र भारतात भारतीय भाषेच्या प्रयोगाकरीता संघर्ष करावा लागतो.
भाषेच्या राजकारणात नेहमीच भारतीय भाषेचा बळी जातो. इंग्रजीच्या वर्चस्वाबद्धल कोणीच काही ब्र शब्द उच्चारीत नाही कारण सर्वसामान्या पेक्षा राजकारणी,संस्थाचालक,नोकरशहा व शहरी लोक इंग्रजीला शरण गेले आहेत. अशावेळी भारतीय भाषेचा विकास करण्याची जबाबदारी भारतीय भाषा प्रेमी यांची आहे.